मुंबई

Raj Thackeray Vs Uddhav Thackeray : राज-उद्धव युतीवरून पुन्हा चर्चा; मनसेचा निर्वाणीचा इशारा – “प्रस्ताव नसेल, तर बोलणीही नाही!”

मनसेची थेट भूमिका – उद्धव ठाकरे यांनीच पुढे येऊन ठोस प्रस्ताव द्यावा, राज ठाकरे यांचे संकेत – “युती शक्य, पण पुन्हा फसवणूक नको”

मुंबई :- महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर एक नवा अध्याय उघडण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. ठाकरे बंधू – राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे – यांच्या राजकीय युतीची चर्चा पुन्हा उफाळून आली आहे. मात्र, या वेळी सुर ठाम आहे आणि भूमिका स्पष्ट! मनसेने थेट सांगितले आहे – प्रस्ताव ठोस नसेल, तर युतीची चर्चा करत बसायचं कारणच नाही.

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी नुकताच राज ठाकरे यांचा एक जुना मुलाखतीतील संदर्भ देत म्हटलं, “राज साहेबांनी शिवसेना (उद्धव गट) सोबत युतीला नकार दिलेला नाही. पण त्यासाठी दुसऱ्या बाजूने स्पष्ट आणि विश्वासार्ह प्रस्ताव यायला हवा.”

देशपांडे यांनी थेटपणे आरोप केला की, “2014 आणि 2017 मध्येही युतीसाठी मनसेने पावले उचलली होती. मात्र, दरवेळी उद्धव ठाकरे यांनी संवाद न साधता फसवणूकच केली.” त्यामुळे यावेळी मनसेने अटी ठाम ठेवल्या आहेत – एकतर ठोस प्रस्ताव द्या, नाहीतर चर्चाच नको.

मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूरसह अनेक महत्त्वाच्या महापालिका निवडणुका जवळ येत असताना या संभाव्य युतीची चर्चा चांगलीच गाजत आहे. मात्र, राजकीय सुसंवादाच्या नावाखाली ‘भूतकाळाची पुनरावृत्ती’ मनसेला मान्य नाही, हे स्पष्ट दिसतेय.

राज ठाकरे यांनी याआधीही अनेकदा म्हटले आहे – “मी शक्यता नाकारत नाही, पण विश्वास गमावलेल्यांना पुन्हा संधी देणं सोपं नसतं.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0