मुंबईदेश-विदेश
Trending

Amit Shah : ऑपरेशन सिंदूर’ हे भारताच्या नव्या लढाऊ धोरणाचे प्रतीक – केंद्रीय गृहमंत्री

Amit Shah On Operation Sindhor : उरी, पुलवामा आणि पहलगाम हल्ल्यांनंतर भारताची ठोस कारवाई – सर्जिकल स्ट्राइकचा उल्लेख,पाकिस्तानचे कट कारस्थान यापुढे सहन केले जाणार नाही” – 2014 नंतरचे बदललेले धोरण

ANI :- केंद्रीय गृहमंत्री यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’चा उल्लेख करताना म्हटले की, “हे ऑपरेशन पंतप्रधानांच्या ठाम इच्छाशक्तीचे, भारतीय सेनेच्या प्रभावी क्षमतेचे आणि अचूक माहिती संकलन यंत्रणेचे मूर्त स्वरूप आहे. Amit Shah On Operation Sindhor ” त्यांनी स्पष्ट केले की पाकिस्तानने अनेक वर्षांपासून भारतात दहशतवादी कारवाया केल्या, पण याआधी भारताने केवळ संरक्षणात्मक भूमिकाच घेतली होती.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, “2014 नंतर परिस्थितीत आमूलाग्र बदल झाला. उरी येथे हल्ला झाल्यानंतर भारतीय सेनेने सर्जिकल स्ट्राइक करत पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला. पुलवामा हल्ल्यानंतरही कठोर प्रत्युत्तर देत दहशतवादी तळ उडवून लावले.”

याशिवाय, त्यांनी पहलगाममधील घटनेचाही उल्लेख केला, जिथे पाक प्रेरित दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांना धर्म विचारून, महिलांसमोर निर्दयपणे ठार मारले. “त्या वेळी पंतप्रधान बिहारमधूनच म्हणाले होते की याचा योग्य बदला घेतला जाईल,” असेही गृहमंत्री म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0