मुंबई

Anjali Damania : छगन भुजबळांच्या शपथविधीवर अंजली दमानियांचा सवाल!

भुजबळांच्या शपथविधीवरून समाजसेविका अंजली दमानियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसवर टीका केलं आहे, ट्विट करण दमानिया यांचे फडणवीस यांना प्रश्न

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्री धनंजय मुंडे यांच्या रिक्त जागेवर छगन भुजबळ यांची वर्णी लागल्यानंतर समाजसेविका अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केल्याचे पाहायला मिळत आहे.

अंजली दमानिया यांनी ट्विटमध्ये काय म्हणाले आहे?

छगन भुजबळ मंगळवारी सकाळी 10 वाजता राजभवनात मंत्रीपदाची शपथ घेणार ?

वाह फडणवीस वाह !

म्हणजे एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री येणार? जनता अशीच भरडली जमणा? की हा माझ्यासारख्या भ्रष्टाचार विरोधी लढणाऱ्यांना संदेश आहे, की तुम्ही आमच काहीच वाकड करू शकत नाही ? ….असा काय नाईलाज आहे ? ….की सभ्य माणसं मिळत नाहीत राजकारणात ?

आणि हो, हेच भुजबळ जेव्हा जेल मधे होते, तेव्हा एक अगदी बिचाऱ्या सारखा फोटो माध्यमांमध्ये दाखवला जायचा. तेव्हा छातीत कळ यायची. मग आता ठणठणीत ? किळस वाटतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची

खालच्या घोषणा आठवतात ?
“भ्रष्टाचारीयो पर कारवाई के लिए, अब की बार 400 पार”“भ्रष्टाचार के खिलाफ मोदी सरकार के बडे कदम”हा आहे का तो बडा कदम ? ही ती कारवाई ?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0