मुंबईठाणे

Ghodbunder Road Closed : ठाणेकरांनो लक्ष द्या! घोडबंदर रोड 18 ते 20 मेपर्यंत बंद, वाहतूक मार्गात मोठा बदल

गायकमुख घाटाजवळ रस्त्याचे डागडुजीचे काम सुरू वाहनचालकांसाठी प्रवेश बंद,पोलिसांचे आवाहन: पर्यायी मार्गाचा वापर करा, गैरमार्गाने जाणाऱ्यांवर कारवाई

ठाणे :- ठाणे शहरातील नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना! ठाणे – घोडबंदर रोडवरील गायकमुख घाटाजवळ सार्वजनिक बांधकाम विभागाचं महत्त्वाचं डागडुजीचं काम 18 मेच्या रात्री 11.45 पासून 20 मेच्या सकाळी 6.00 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या कालावधीत या रस्त्यावर सर्वप्रकारची वाहतूक पूर्णतः बंद राहणार आहे.

वाहनधारकांनी व नागरिकांनी या दरम्यान घोडबंदर रोड टाळावा आणि पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे ठाणे वाहतूक पोलिसांनी स्पष्टपणे सांगितले आहे. विशेषतः गायकमुख घाट (घोडबंदर रोड) मार्गावर कोणतीही साईडिंग अथवा गैरप्रकार केल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.रविवार, 21 मे रोजी रात्री 11.45 पर्यंत हे सर्व काम पूर्ण करण्याचे लक्ष्य असून, तोपर्यंत या भागात वाहतुकीस मर्यादा असतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0