मुंबई

Navi Mumbai Crime News : नवी मुंबईमध्ये बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांवर कारवाई; बनावट कागदपत्रे आणि पासपोर्ट उघड

बनावट कागदपत्रांच्या आधारे वास्तव्य करणाऱ्या 2 बांगलादेशींना अटक; अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची कारवाई, पहलगाम हल्ल्यानंतर पोलिस सतर्क

नवी मुंबई :- पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्र पोलिसांनी सतर्कतेचा भाग म्हणून मोठी शोध मोहीम हाती घेतली आहे. या पार्श्वभूमीवर पनवेलमधील करंजाडे परिसरात बेकायदेशीरपणे वास्तव्य करत असलेल्या 5 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या आरोपींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय ओळखपत्रे व पासपोर्ट मिळवले होते.

धक्कादायक बाब म्हणजे, या आरोपींनी भारतीय ओळखपत्रे जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र मिळवले होते. यापैकी तिघांनी तर बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय पासपोर्टही तयार केले होते. हे सर्व काम एका भारतीय एजंटाच्या मदतीने केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

गुन्हयातील बांगलादेशी नागरीकांना भारतीय कागदपत्र बनवण्याकरीता व भारतात वास्तव्य करण्याकरीता मदत करणारा सह आरोपी मोहम्मद इस्माईल अमिन्नोदीन येरूलकर, ( वय 52 , रा.सेक्टर 06, करंजाडे, पनवेल, रायगड) यांने वरील बांगलादेशी नागरीकांचे बनावट पासपोर्ट व जन्मदाखले ईस्माइल शेख यांच्यामार्फत कलबुर्गी कर्नाटक राज्य येथे बनवल्याचे सांगितले. त्यावरून कलबुर्गी, कर्नाटक राज्य येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख व पोलीस पथक पाठवले असता, बनावट जन्मदाखले बनविणारा इसम नामे ईस्माईल शब्बिर मिया शेख यास ताब्यात घेवुन त्याच्याकडे तपास केला असता, त्याने पासपोर्ट तयार करण्यासाठी जन्मदाखले बनवुन दिल्याचे सांगिल्यावरून त्यास नमुद गुन्हयात दिनांक 7 मे रोजी अटक करण्यात आली आहे.

गुन्हयातील बांगलादेशी अटक महिला आरोपी हिच्याकडे तिचे इतर नातेवाईक भारतात कोठे वास्तव्यास आहेत काय? याबाबत तपास केला असता तिचे आई व भाऊ हे मिरा भाईंदर, ठाणे येथे वास्तव्यास असलेबाबत माहीती प्राप्त झाल्यावरून त्याठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील व पथक यांना रवाना केले असता, आरोपीचा लहान भाऊ नामे राहूल उर्फ मिकाईल ईस्माईल गाझी व त्याची आई नामे सुफियाबेगम ईटमाईल गाझी, ( दोन्ही सध्या रा.खरीगांव, भाईदर ईस्ट, ठाणे) येथे मिळून आले. त्यांना ताब्यात घेवुन चौकशी केली असता, ते मुळ राहणार मुळ गाझीपुर थाना- बेनापुल, (जिल्हा-जोशोर, बांगलादेश) येथील असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यावरून सुफियाबेगम ईस्माईल गाझी हिच्या विरोधात सन 2012 मध्ये विशेष शाखा, आय बॅच, मुंबई यांनी गुन्हा दाखल असून तिच्या विरोधात न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढले असल्याबाबत माहीती मिळाली. त्याबाबत विशेष शाखा, आय बॅच, मुंबई यांना माहीती दिली आहे. राहूल उर्फ मिकाईल ईस्माईल गाझी यास दिनांक 11 मे रोजी अटक करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0