PUNE CRIME NEWS : वरिष्ठ पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या धाकाने पर्वती ‘शांत’ : एका वर्षात तब्बल ११ गुंडांवर MPDA

- पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाया
- पर्वती हद्दीतील गुन्हेगारी संपुष्ठात आणण्यासाठी कडक कारवाया
पुणे, दि. १३ मे, महाराष्ट्र मिरर : मुबारक जिनेरी
PUNE CRIME NEWS : पुण्यात गुंडगिरी, गुन्हेगारीसाठी कुप्रसिद्ध असणाऱ्या पर्वती हद्दीत एकाच वर्षात ११ गुंडावर MPDA कारवाई करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या धाकाने गुन्हेगारी शांत झाल्याची चर्चा आहे. आज जनता वसाहत येथील गुन्हेगार वैभव सुनील मोरे यास कळंबा कारागृह कोल्हापूर येथे १ वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले. PUNE CRIME NEWS
पुणे शहरात गॅंगवॉर, वाहन तोडफोड, गुन्हेगारीच्या घटना होत असताना पर्वती सारख्या संवेदनशील हद्दीत शांतता प्रस्थापित करण्यात पर्वती पोलिसांना यश आले आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त प्रवीण पाटील, उपायुक्त संभाजी कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली पर्वती पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड (SR. POLICE INSPECTOR NANDKUMAR GAIKWAD) यांनी १ वर्षात ११ गुंडांना स्थानबद्ध केले आहे. तसेच महाराष्ट्र्र पोलिस कायदा कलम ५५,५६ प्रमाणे १६ प्रस्ताव दाखल करून २२ गुन्हेगारांना तडीपार करून पर्वती पोलिस स्टेशन हद्दीत गुन्हेगारांवर वचक निर्माण केला आहे .

पुणे शहरात गॅगवार ची सुरुवात दत्तवाडी मधून झाली होती, पोलिस स्टेशन चे हद्दीत ८०% भाग हा मिश्र वस्तीचा असून जनता वसाहत ही सर्वात मोठी झोपडपट्टी आहे, वेगवेगळ्या टोळ्या आणि त्यातून घडणारे शरीराविरूध्दचे गुन्ह्याचे प्रमाण जास्त होते , परंतु वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड आणि अधिकारी व अंमलदार यांनी कठोर प्रतिबंधक कारवाया करून गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवले आहे.


