Sunday Mega Block News : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी : उद्या रविवारी 11मे रोजी मध्य, हार्बर रेल्वेवर ब्लॉक!

•रेल्वेरुळांसह सिग्नल यंत्रणेची देखभाल-दुरुस्ती कामकाजामुळे रेल्वे कडून मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. मेगा ब्लॉक दरम्यान अनेक लोकल गाड्या विस्कळीत होण्याची शक्यता
मुंबई :- मुंबईकरांसाठी तसेच उपनगरीय रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.रेल्वेने रविवारी 11 मे रोजी ब्लॉक घोषित केला आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड आणि हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे.रेल्वेरुळांसह सिग्नल यंत्रणेची देखभाल-दुरुस्ती करण्यात येते. त्यामुळे अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या असून अनेक लोकल रेल्वे या 15 ते 20 मिनिटांनी उशिराने धावणार आहे.
मध्य रेल्वे
माटुंगा ते मुलुंड अप आणि डाउन जलद दरम्यान सकाळी 11.05 ते दुपारी 3.10 मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.ब्लॉकवेळेत अप-डाउन सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील.यामुळे लोकल फेऱ्या 15 ते 20 मिनिटे विलंबाने धावणार असून काही लोकल रद्द राहणार आहेत. ठाण्यापुढे जाणाऱ्या जलद गाड्या मुलुंड स्थानकावर डाऊन जलद मार्गावर पुन्हा वळवल्या जातील.
हार्बर रेल्वे
कुर्ला ते वाशी अप आणि डाउन सकाळी 10.40 ते सायंकाळी 4.40 मेगा ब्लॉक घेण्यात येणार असून ब्लॉक वेळेत ठाणे ते पनवेल/वाशी/नेरुळदरम्यान धावणाऱ्या ट्रान्स-हार्बरवरील अप आणि डाउन लोकल फेऱ्या बंद राहणार आहेत. हार्बर मार्गावर कोणताही ब्लॉक असणार नाही. यामुळे वेळापत्रकाप्रमाणे हार्बरवर लोकल धावणार आहेत.पायाभूत सुविधांच्या देखभाल दुरुस्ती आणि सुरक्षिततेसाठी हे देखभाल मेगा ब्लॉक आवश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगीर असून रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती आहे.


