
Raj Thackeray Latest News : देशाने एकजुटीने आणि भारतीय सैन्य आणि सीमा भागातील लोकांच्या पाठी उभे राहिले पाहिजे ; राज ठाकरे
मुंबई :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी ‘मुंबई तक’ या डिजिटल वृत्तवाहिनीला शनिवारी 10 मे रोजी मुलाकात देणार होते परंतु सध्या देशात भारत आणि पाकिस्तान तणावपूर्ण परिस्थितीमुळे ही मुलाखत उचित ठरणार नाही Raj Thackeray Latest News त्यामुळे राज ठाकरे यांनी पोस्ट करत हे मुलाखत रद्द करण्याचे आणि पुढे ढकलण्याची विनंती केली आहे. सध्या देशातील सैन्य सीमा भागातील भारतीय नागरिकांशी एकजूटी उभे राहणे महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे.
राज ठाकरे म्हणाले की,येत्या शनिवारी 10 मे ला पुण्यात ‘मुंबई तक’ ही डिजिटल वृत्तवाहिनी माझी विशेष मुलाखत घेणार होते. पण जेंव्हा देशांच्या सीमांवर कमालीचा ताण तणाव असताना, मुलाखत, गप्पा अशासारखे कार्यक्रम करणं उचित नाही असं माझं मत आहे. त्यामुळे मी ही भावना ‘मुंबई तक’ च्या संपादकीय टीमला कळवली आणि त्यांनी देखील या भावनेचा उचित सन्मान करत ही मुलाखत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.
राज ठाकरे पुढे म्हणाले की,या काळात सर्व देशाने एकजूट असणं आणि भारतीय सैन्य आणि सीमाभागातील भारतीय नागरिकांच्या सोबत असणं, त्यांच्यासाठी प्रार्थना करणं हेच महत्वाचं आहे.
त्यामुळे ही मुलाखत रद्द झाल्याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी ही विनंती… बाकी सगळ्या विषयांवर नंतर सविस्तर बोलूच… अशी पोस्ट करत राज ठाकरे यांनी ही मुलाखत रद्द करण्याचे घोषित केले आहे.



