Virar Crime News : तरुणाला गांजा विक्री करताना पकडलं; 10 किलो गांजा जप्त

•Youth Caught Selling Drugs In Virar विरार गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला गुन्हे शाखा कक्ष-3,विरार पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. आकाश अजित जाधव अस अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
विरार :- विरार येथे गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. आकाश अजित जाधव (30 वय) अस अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. Virar Crime News त्याच्याकडून 3.03 लाखांचा 10 किलो 100 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.
विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चंदनसार, कातकरी पाडा (विरार पूर्व) परिसरात विक्रीसाठी येणार असल्याची खात्रीदायक माहिती पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा कक्ष-3, (विरार) शाहूराज रणवरे यांना मिळाली होती. वरिष्ठांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलिसांनी निरीक्षक सुहास कांबळे यांचे पोलीस पथकाने दोन पंचासह चंदनसार, कातकरी पाडा येथे सापळा रचून संशयीत आरोपी आकाश अजित जाधव याला ताब्यात घेतले. Virar Crime News बॅग आणि पिशवी मध्ये दहा किलो 100 ग्रॅम वजनाचा गांजा होता. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात आकाश जाधव याच्यावर एनडीपीएस कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे यांच्या टीम ने केली आहे.
पोलीस पथक
पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय, अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, अविनाश अंबुरे पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मि.भा.वि.व पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शाहुराज रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, पोलीस हवालदार मुकेश तटकरे, रमेश आलदर, सागर बारवकर, प्रशांत पाटील, अमोल कोरे, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, सुमित जाधव, पोलीस अंमलदार राकेश पवार, आतिश पवार, तुषार दळवी, मनोहर तारडे, सागर सोनवणे, प्रविण वानखेडे सर्व नेमणुक गुन्हे शाखा कक्ष-3 यांनी उकृष्टरित्या पार पाडली आहे.


