मुंबई

ठाणे महानगरपालिकेच्या माजी विरोधी पक्षनेतेचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

•राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अनेक माजी नगरसेवक शिवसेना शिंदे गटात

मुंबई : – शिवसेना शिंदे गटाकडून ठाण्यात भाकरी फिरवण्यात आली असून पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का दिला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या बालकिल्यात शिंदे गटाने सुरुंग लावत अनेक महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी आपल्या पक्षात घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. मागील अनेक वर्षांपासून ठाणे महानगरपालिकेवर एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व असून आता विरोधकातील पक्षांना शिंदे गटाकडून सुरुंग लावण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर पुढील चार महिन्यात राज्यात अनेक महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होतील तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसल्याचे पाहायला मिळत आहे. ठाणे महानगरपालिकेच्या माजी विरोधी पक्ष नेते मिलिंद पाटील यांच्यासह अनेक नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कळवा, खारेगाव, विटावा विभागातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. माजी नगरसेविका मनाली पाटील, महेश साळवी, मनीषा साळवी तसेच ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्याध्यक्ष सुरेखा पाटील, माजी नगरसेवक सचिन मात्रे यांनी भगवा झेंडा हाती घेत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0