मुंबई

Navi Mumbai Bribe News : नवी मुंबईतील बेलापूर कोर्टामधील शिपायाला लाच घेताना अटक, नवी मुंबई एसीबीची कारवाई

•संतोष तुकाराम माने , शिपाई, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सीबीडी बेलापूर कोर्ट याला अडीच हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबी नवी मुंबईने केले अटक

नवी मुंबई :- प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बेलापूर 9 वे कोर्ट , बेलापूर नवी मुंबई येथे काम करणाऱ्या शिपाई संतोष तुकाराम माने यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नवी मुंबई यांनी ताब्यात घेतले आहे. तक्रारदार यांना स्थगितीचे कागदपत्र मिळवून देण्याकरिता शिपायाने अडीच हजार रुपयांचे लाच मागितली होती. याप्रकरणी शिपायाविरोधात सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार यांनी वाशी, सेक्टर 11, नवी मुंबई येथील एका अनधिकृत इमारतीच्या बांधकामाबाबत सिडको कार्यालय व नवी मुंबई महानगरपालिका कार्यालयात तक्रार दाखल केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका व सिडको कार्यालयाकडून त्या इमारतीच्या सोसायटीला इमारत निष्कासित करण्याबाबत नोटीस बजाविण्यात आली होती. नोटीसच्या अनुषंगाने संबंधित सोसायटीने निष्कासन कारवाई विरोधात स्थगिती मिळणेकरीता न्यायालयात अपील दाखल केले होते त्याअनुषंगाने न्यायालयाने निष्कासन कारवाईस स्वगिती दिल्याने तक्रारदार यांनी न्यायालयात स्थगिती आदेशाची कागदपत्रे मिळणेकरीता अर्ज दाखल केला होता.

अर्जामधील कागदपत्रे मिळवुन देणेकरीता शिपाई संतोष माने हे तकारदार यांचेकडे 2500 रूपयांची मागणी करीत असलेबाबत 6 मे 2025 रोजी तकार प्राप्त झाली होती.तरी तक्रारदार याचे प्राप्त तकारीनुसार 6 मे 2025 रोजी पंचासमक्ष केलेल्या लाच मागणी पडताळणी वेळी लोकसेवक हे 2500 रूपयांची मागणी करीत असल्याचे निष्पन्न झाले होते.

त्याअनु‌सार आज (7 मे) रोजी करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान शिपाई संतोष माने यांना तक्रारदार यांचेकडुन 2500 रूपये अशी लाचेची रक्कम पंच साक्षीदार यांचेसमक्ष स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. आरोपीच्या विरोधात सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक (एसीबी नवी मुंबई) अरुंधती येळवे यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0