
Vasai Latest Crime News : वसई पोलीस ठाण्यात प्रियकर आणि त्याच्या वडिलांच्या विरोधात आत्महत्या प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल, दोघेही फरार.. लग्नाला नकार देण्याचे धक्कादाय कारण समोर!
वसई :- वसईतील 20 वर्षीय तरुणीने आत्महत्या केली आहे. रेवती उमेश निळे असे या तरुणीचे नाव आहे. तू खालच्या जातीची आहेस असे सांगून प्रियकराच्या घरच्यांनी लग्नाला नकार दिल्याने तरुणीने उचललेले हे पाऊल.आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वसई पोलिसांनी Vasai Police News तिचा प्रियकर आयुष राणा आणि त्याचे वडील अजय राणा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,रेवती निळे (20 वय ) ही तरूणी वसई पश्चिमेच्या भास्करआळी श्रीनगर परिसरात राहत होती. तिने नैराश्यातून 27 एप्रिल रोजी उंदीर मारण्याचे औषध प्राशन करून आत्महत्या केली होती. रेवतीचे तिच्याच महाविद्यालया शिकणाऱ्या आयुष राणा याच्यासोबत गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. तसेच लग्नाच आमिष दाखवून त्याने अनेक वेळा शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. मात्र लग्नाच्या विषयावेळी मुलाचे वडिल अजय राणा (51वय) यांनी देखील रेवतीला तुझ्या कुंडलीत मृत्यूयोग असल्याचे कारण देत हे लग्न होऊ शकणार नाही असे कारण दिले.याशिवाय तू खालच्या जातीची आहे असं कारण देत लग्नाला नकार दिला. त्यामुळे नैराश्यातून आत्महत्येचे पाऊल उचलले असल्याचे तिच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी वसई पोलीस ठाण्यात Vasai Police Staion प्रियकर व त्याचे वडील दोघांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील दोन्ही आरोपी फरार असून या संपूर्ण घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक तात्या सावंत करीत आहे.


