क्राईम न्यूज
Trending

Bhiwandi Bribe News : पन्नास हजारांची लाच घेताना शिक्षक व मुख्याध्यापक रंगेहात पकडले

Thane ACB Trap News : ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शिक्षक आणि मुख्याध्यापकाला लाच घेताना पकडले

भिवंडी :- बनावट सेवा पुस्तिका तयार करून त्यावर वेतन आयोगानुसार नोंदी आणि शिक्के घेण्यासाठी एका शिक्षक आणि मुख्याध्यापकाला पन्नास हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे.शिक्षक शहाजान मोहम्मदअली मौलाना आणि मुख्याध्यापक जियाउर रहमान मजहरुल्हक अन्सारी असं लाचखोर मुख्याध्यापक आणि शिक्षकाचे नाव आहे. Bhiwandi Bribe News

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार,बनावट सेवा पुस्तिका तयार करून त्यावर वेतन आयोगानुसार नोंदी आणि शिक्के घेण्यासाठी शिक्षक शहाजान मोहम्मदअली मौलाना आणि मुख्याध्यापक जियाउर रहमान मजहरुल्हक अन्सारी या दोघांनी 50 हजारांची लाच मागितल्याचे तक्रारदाराने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सांगितले होते.तक्रारदार याच्या तक्रारीच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता, शहाजान मौलाना यांनी लाचेची मागणी केली आणि मुख्याध्यापक अन्सारी यांनी त्या मागणीस दुजोरा देऊन तक्रारदारास लाच देण्यासाठी प्रवृत्त केले असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर, 30 एप्रिल रोजी शिक्षक मौलाना यांनी तक्रारदारास पुन्हा संपर्क करून, मूळ लाच रक्कमेसोबतच खासगी टायपिस्ट आणि शिक्क्यांसाठी अतिरिक्त 10 हजार मागणी केली. त्यामुळे एकूण लाच रक्कम 60 हजार रुपये इतकी झाली.यावर 1 मे रोजी ठाणे एसीबीने कारवाई करत शहाजान मौलाना यांना लाच स्विकारताना रंगेहात पकडले, तर मुख्याध्यापक अन्सारी यांनाही अटक करण्यात आली. दोघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0