मुंबईमहाराष्ट्र
Trending

1 May Kamgar Divas : कामगार दिनाचा इतिहास

1 may Kamagar Divas : 1 मे 1889 मध्ये अमेरिकने ‘कामगार दिन’ साजरा करण्याच्या प्रस्तावाच्या जवळपास 34 वर्षांनंतर भारतात कामगार दिन साजरा करण्यास सुरूवात झाली. भारतातील चेन्नईमध्ये 1923 मध्ये सर्वप्रथम कामगार दिन साजरा करण्यात आला. ‘श्रमिक किसान पार्टी ऑफ हिंदूस्थान’च्या अध्यक्षतेखाली कामगार दिन साजरा करण्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर हळूहळू इतर अनेक कामगार संघटनांनी हा दिवस साजरा करण्यास सुरूवात झाली. भारतात दरवर्षी 1 मे रोजी कामगार दिन साजरा केला जात आहे. अनेक राज्यात या दिवशी सार्वजनिक सुट्टी देखील देण्यात येते.

पूर्वी कामगारांना दररोज 15 ते 16 तास काम करावे लागायचे. 15 ते 16 तास काम करून त्याबदल्यात मोबदला देखील मिळायचा नाही. सुट्टी तर लांबचीच गोष्ट होती. त्यामुळे या अन्यायकारक कामाच्या वेळा, कमी वेतन यासारख्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी 1866 साली कामगारांनी एकत्र येत जोरदार आंदोलन छेडले. या आंदोलनात कामागारांनी दिवसाचे आठ तास काम, योग्य वेतन आणि सु्टटी यासाठी संघर्ष सुरू केला.

या लढ्याचे प्रतिक म्हणून 1889 साली मार्क्सवादी आंतरराष्ट्रीय समाजवादी कॉंग्रेसने एक ठराव मंजूर केला. या ठरावात कामारांकडून 8 तासांपेक्षा अधिक काम करून घेऊ नये, अशी मागणी करण्यात आली. या दरम्यान कामगार आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. या चकमकीत पोलिसांसह अनेक कामगारांचा मृत्यू झाला. यानंतर १ मे १८८९ रोजी एक बैठक झाली आणि हा दिवस ‘कामगार दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. आज हा दिवस कामगार दिन किंवा आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो, जो कामगारांच्या संघर्षाची आणि योगदानाची आठवण करून देतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0