महाराष्ट्र
Trending

Mahayuti Sarkar : महायुती सरकारचा शंभर दिवसाचा रिपोर्ट कार्ड जाहीर

Mahayuti Sarkar Latest News : मंत्री आदिती तटकरे यांचा महिला आणि बाल विकास विभाग रिपोर्ट कार्ड मध्ये प्रथम क्रमांकावर

मुंबई :- राज्यात महाराष्ट्र दिनाच्या जल्लोषात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी राज्यातील महायुती सरकारचा शंभर दिवसाचा कारभाराचा रिपोर्ट कार्ड सादर केला आहे. या रिपोर्ट कार्ड मध्ये कोणत्या विभागाने किती कामे केले आहे कशा पद्धतीने त्यांना मार्क देण्यात आले आहे त्याचा सविस्तर अहवाल एक्सवर पोस्ट केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री आदिती तटकरे Aditi Tatkare यांच्याकडे असलेल्या महिला आणि बालविकास विभाग राज्यात अव्वल स्थानी असल्याचे रिपोर्ट कार्ड मध्ये जाहीर करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले रिपोर्ट कार्ड

राज्यात नवीन महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर शासनाच्या सर्व 48 विभागांनी 100 दिवसांचा धोरणात्मक बाबींचा कार्यक्रम हाती घेऊन महत्त्वाची नवीन धोरणे, दूरगामी निर्णय व लोकाभिमुख उपक्रमांची आखणी सुरू केली.

गेल्या 100 दिवसात या सर्व विभागांनी निश्चित केलेल्या 902 धोरणात्मक उद्दिष्टांपैकी 706 उद्दिष्टे (78%) पूर्णतः साध्य केली आहेत तर उर्वरित 196 उद्दिष्टे पूर्ण होईपर्यंत संबंधित विभाग आपले काम चालूच ठेवतील.

एकूण 48 विभागांपैकी 12 विभागांनी आपली 100% उद्दिष्ट पूर्तता केली आहे तर आणखी 18 विभागांनी 80% पेक्षा जास्त उद्दिष्टे साध्य केली आहेत. सविस्तर माहिती तुम्हाला maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पाहता येईल.

या परिवर्तनशील व सर्वंकष विकासाच्या वाटचालीच्या मोहिमेत सर्व विभागांनी केलेल्या अतिशय प्रभावी कामगिरीबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांनी भविष्यात सुद्धा अशीच चांगली कामगिरी करावी, यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0