महाराष्ट्र

महाराष्ट्रातील 9 मान्यवरांचा गौरव,राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांचे वितरण

•ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर, गझल गायक पंकज उधास (मरणोत्तर), आणि माजी बिहार उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले

ANI :- राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या ‘पद्म पुरस्कारां’वितरण करण्यात आले आहे.सोमवारी (28 एप्रिल) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये संपन्न झाला.

ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर, गझल गायक पंकज उधास (मरणोत्तर), आणि माजी बिहार उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच भारतीय हॉकीपटू पी.आर. श्रीजेश, तमिळ अभिनेता एस. अजित कुमार, झायडस लाइफसायन्सेसचे चेअरमन पंकज पटेल आणि ‘फादर ऑफ पेंटियम’ म्हणून प्रसिद्ध असलेले भारतीय-अमेरिकन अभियंता विनोद धाम यांनाही पद्मभूषण देण्यात आला. या समारंभात दिवंगत ओसामु सुझुकी (सुझुकी मोटर कॉर्पोरेशनचे माजी प्रमुख) यांनाही पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्रातून नऊ मान्यवरांचा विशेष सन्मान करण्यात आला. यामध्ये अरुंधती भट्टाचार्य, पवनकुमार गोयंका, जस्पिंदर नरुला, रानेद्र भानू मजुमदार, वासुदेव कामत, चैत्राम पवार आणि मारुती चित्तमपल्ली यांचा समावेश आहे.

अरुंधती भट्टाचार्य, सध्या सेल्सफोर्स इंडियाच्या चेअरपर्सन आणि सीईओ आहेत. भारतीय स्टेट बँकेतडिजिटल परिवर्तन घडवून आणण्याचे त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. पवनकुमार गोयंका, माजी महिंद्रा अँड महिंद्राचे व्यवस्थापकीय संचालक, यांनी ऑटोमोटिव्ह आणि शेती उपकरणे व्यवसायात मोठी कामगिरी केली आहे.

सोलापूरचे सुपुत्र व ‘अरण्यऋषी’ म्हणून ओळखले जाणारे मारुती चित्तमपल्ली यांना वन्यजीव अभ्यास आणि साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. सुप्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत , बांसुरी वादक रानेद्र भानू मजुमदार, गायक जसपिंदर नरुला, आणि पर्यावरण रक्षणासाठी कार्यरत असलेले चैत्राम पवार यांनाही पद्मश्री पुरस्काराने गौरवले गेले.

या पुरस्कार समारंभावेळी उपराष्ट्रपती जगदीप धनखड , पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची प्रमुख उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0