क्राईम न्यूजपुणे
Trending

Pune Fake Currency News : बनावट नोटांची छपाई, विक्री करणारी टोळी पुणे पोलिसांच्या ताब्यात

Pune Police Busted Fake Currency Racket : दोनशे रुपयांच्या बनावटी नोटांचा बाजारात सुळसुळाट 28 लाखांच्या बनावट नोटा जप्त करून 5 जणांना अटक केली

पुणे :- कोटक महिंद्रा बँकेच्या मॅनेजर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बनावट नोटांचा भांडाफोड झाला आहे. Pune Fake Currency Racket Busted पोलिसांनी 28 लाख रुपये किंमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. त्याशिवाय बनावट नोटांचं मशीन ताब्यात घेतले आहे. पुणे पोलिसांनी Pune Police या प्रकरणी 5 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. बँकेच्या सोडीएम मशीनमध्ये दोनशे रुपयांच्या बनावट नोटा आढळल्याने संपूर्ण टोळीचा भांडाफोड झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

पुण्यात पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 28 लाख 66 हजार 100 रुपये किंमतीच्या बनावट नोटा पकडल्या आहेत. याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींमध्ये दोन महिलांचाही सहभाग आहे. पोलिसांनी आरोपींकडून एक प्रिंटर मशीन तसेच 500 आणि 200 रुपयांच्या नोटांचे प्रिंटेड गठे हस्तगत करण्यात आले आहेत. ही कारवाई शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या सायबर पथकाने केली आहे. मनीषा ठाणेकर, भारतीय गवंड, सचिन यमगर, नरेश शेट्टी, प्रभू गुगलचड्डी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत.

बँकेत बनावट नोटा जमा केल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना Shivaji Nagar Police मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला आणि या प्रकरणाचा पर्दाफाश करण्यात आला. पोलिसांनी 28 लाख 66 हजार 100 रुपयांच्या प्रिंट केलेल्या बनावट नोटा आणि 2 लाख 4 हजार रुपयांच्या खऱ्या नोटा जप्त केल्या आहेत. पोलिसांनी पाच आरोपींना बेड्या ठोकल्या असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. शिवाजीनगर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

पोलीस पथक
पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त ,रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, प्रविण पाटील, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-1, संदिपसिंह गिल्ल, सहा पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे, विश्रामबाग विभाग यांचे मार्गदर्शनाखाली,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे), चंदकांत सुर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक के बी डाबेराव, पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, पोलीस अंमलदार नलिनी क्षिरसागर, आदेश चलायादी, तेजस चोपडे, गणेश जाधवर, श्रीकृष्ण सांगवे, प्रविण दडस, रुचिका जमदाडे, स्वालेहा शेख (एटीसी) यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0