Mumbai Drugs News : सिमेंट कारखान्यात सुरू होता एमडी बनवण्याचा कारखाना ; पोलिसांची कामगिरी कोट्यावधीचा एम डी पदार्थ जप्त

•सिमेंट कंपनीच्या नावाखाली पदार्थ तयार करणाऱ्या कारखान्याचा पोलिसांनी घेतला शोध, साकीला का अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई, दोन आरोपींना अटक
मुंबई :- मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी वसईतील कामन गाव परिसरातील एक सिमेंट ब्लॉक निर्माण करणाऱ्या कंपनीवर छापा मारला. छाप्याच्या कारवाईतील पोलिसही चक्रावून गेले. पोलिसांनी सिमेंट कंपनीत तयार होत असलेल्या एमडी ड्रग्जच्या निर्मितीवर घाला घातला आहे.
एमडी ड्रग्जविरोधी कारवाईत पोलिसांना चांगले यश मिळाले. या कारवाईत पोलिसांनी सुमारे 4 किलो MD ड्रग जप्त केले आहेत. अंदाजानुसार याची किंमत बाजारात 8 कोटींच्या घरात असल्याचे म्हटले जात आहे. तसेच दोन आरोपींना या प्रकरणी पोलिसांनी अटक केल्याचे सांगण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साकीनाका पोलीस ठाण्यातील आपले पदार्थ विरोधी पथक गस्ती करत असताना सुलभ शौचालयाच्या बाजूला रेतीवाला कंपाऊंड, सेंट ज्युड सर्कल, काजू पाडा साकीनाका येथे एक व्यक्ती संशयितरित्या हालचाली करत असल्याचे पाहायला मिळाले. त्यादरम्यान गस्ती घालत असताना पोलीस निरीक्षक यांनी संशयित आरोपीचे अंग झडती घेतली असता त्याच्या ताब्यात दहा लाख सात हजार रुपये किंमतीचे 53 ग्रॅम वजनाचे एमडी आपले पदार्थ मिळून आला. पोलिसांनी या प्रकरणी सादिक साहिल शेख (28 वय रा. राहुल नगर, कॉलनी जवळ बांद्रा) याला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीची सखोल चौकशी केली असता आरोपी सादिक येणे अमली पदार्थ विक्री करत असल्याचे कबूल केले तसेच अंमली पदार्थ मिरा रोड येथील सिराज सुलतान पंजवानी (रा. मिरा रोड) याच्याकडून विक्रीसाठी आल्याचे कबूल केले आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथकाने सिराज पंजवानी याचा मिरा रोड परिसरात शोध घेवुन त्यास दिनांक 26 एप्रिल रोजी अटक केली व त्यानेकडे केलेल्या तपासात सिराज यास एमडी हा अंमली पदार्थ काळुराम चौधरी हा व्यक्ती बनवुन विकत असल्याने सांगितले. काळुराम चौधरी याचा शोध घेत असताना कामण गांव, (ता. वसई, जि. पालघर) येथील काळुराम चौधरी चालवित असलेल्या एम. के. ग्रीन, एएसी ब्लॉक कंपनी येथे जावुन शोध घेतला असता आरोपी मिळुन आला नाही.परंतु प्लांटची पाहणी केली असता तेथील एका शेडमधुन एमडी हा अंमली पदार्थ बनवित असल्याचे तपासातुन निष्पन्न झाले. सदर शेडची झडती घेवुन 4 किलो वजनाचा एम.डी हा अंमली पदार्थ व एमडी बनिवण्याचे साहित्य त्यामध्ये
1.सेंट्री फ्युगल मशीन याचा वापर द्रव रासायनिक मिश्रणातुन घन पदार्थ करण्यासाठी होतो. (Liquid to solid)
2.दोन फिजर-क्षमता प्रति फिजर 300 लिटर याचा वापर घन पदार्थाचे स्फटिकीकरण करण्यासाठी होतो.(Slow Cooling- Solid to crystal)
असे सर्व मिळुन आतापर्यंत एकूण 8 कोटी 4 लाख 62 हजार रूपये किंमतीचा मुददेमाल नमुद गुन्ह्यात जप्त करण्यात आला आहे.
पोलीस पथक विवेक फणसळकर पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई देवन भारती विशेष पोलीस आयुक्त, बुहन्मुंबई सत्यनारायण चौधरी, पोलीस सह आयुक्त, (का व सु) बृहन्मुंबई परमजीतसिंह दहिया, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, मुंबई सचिन गुंजाळ, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-10, मुंबई,प्रदीप मैराळे, सहाय्यक पोलीस आयुक्, साकीनाका विभाग, मुंबई योगेश रामचंद्र शिंदे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, साकीनाका पोलीस ठाणे, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक दयानंद काशिनाथ वणवे (तपासी अधिकारी), पोलीस उपनिरीक्षक पंकज रामधन परदेशी, पोलीस हवालदार चंद्रकांत शामराव पवार,नितीन उत्तम खैरमोडे, पोलीस शिपाई अनिल पांडुरंग करांडे, पोलीस हवालदार विशाल पिसाळ (परीमंडळ 10 अंतर्गत तांत्रिक मदत) यांनी कारवाई करत कारखाना उध्वस्त केला आहे.


