महाराष्ट्र

Palghar Crime News : वाडा वनपाल ‘एसीबी’च्या जाळ्यात; 20 हजारांची लाच घेतांना रंगेहात पकडले

घरकुलाचे बांधकाम बंद न पडण्याकरिता स्वीकारली रक्कम

पालघर :- घरकुल बांधकाम करण्याकरिता गणेशपुरी वनविभाग येथे घर बांधकामासाठी परवानगी अर्ज दाखल करण्यात आला होता. परंतु घरकुल बांधकाम परवानगीसाठी वनपाल यांनी 50 हजारांची लाच मागितली होती.त्यानंतर तडजाेडीअंती 20 हजार रुपये स्वीकारताना नांदती,वाडा वनपालास लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात पकडले आहे.

महेंद्र भबुतराव सोलंकी (वय 33) असे अटक झालेल्या वनपालाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार यांना कोशिमशेत या गावात पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकुलाकरीता अनुदान मंजुर झाल्याने ते सध्या राहत्या घरासमोरील मोकळया जागेत नविन घरकुल बांधण्याचे काम सुरू असुन त्याकरीता घरबांधणी परवानगीचा अर्ज गणेशपुरी वनविभागाचे कार्यालयात प्रलंबित आहे.

तक्रारदार यांना नविन घरकुल बांधणी करण्याकरीता व सुरू असलेले घरकुलाचे बांधकाम बंद न पाडण्याकरीता सदर कार्यालयाचे वनपाल महेंद्र सोलंकी यांनी 50 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रार, तक्रारदार यांनी 27 फेब्रुवारी 2025 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पालघर कार्यालयास दिली.

तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने दि. 27 फेब्रुवारी रोजी करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान लोकसेवक यांनी कागदावर 30,25,20 असा अंक लिहुन चर्चेअंती तक्रारदार यांचे कडे 20 हजार रूपये लाचेची मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर 1 एप्रिल रोजीच्या सापळा कारवाई दरम्यान यांनी तक्रारदार यांच्याकडे मागणी केलेली लाचेची रक्कम 2 एप्रिल रोजी घरी येवुन स्विकारण्याची तयारी दर्शवली असल्याचे पंचासमक्ष करण्यात आलेल्या कारवाईमध्ये निष्पन्न झाले, परंतु आज रोजी लोकसेवक यांनी तक्रारदार यांच्याशी संपर्क न केल्यानेमहेंद्र सोलंकी, वनपाल यांचेविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 (सुधारीत अधि. 2018) चे कलम 7 प्रमाणे मांडवी पोलीस ठाणे येथे अन्वये लाचेच्या मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सुरु आहे.ही कारवाई पोलीस उपअधिक्षक हर्षल चव्हाण, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पालघर यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0