•केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांना उपस्थित केले होते प्रश्न, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही उद्धव ठाकरे यांना उपस्थित केला प्रश्न
मुंबई :- देशात CAA कायदा लागू करण्यात आला असून या कायद्याला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कडाडून विरोध केला आहे. या नागरिकत्व कायद्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनाही प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांनी सीएए बद्दल आपली भूमिका स्पष्ट करावी. त्यालाच आता महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भाजपा चंद्रशेखर बावनकुळे यांनीही उद्धव ठाकरे यांना सवाल उपस्थित केला आहे. Chandrasekhar Bawankule
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की,‘‘नागरिकत्व सुधारणा कायद्यावर तुमची भूमिका काय? हे आधी जाहीर करा‘‘, असे आव्हान आमचे नेते आणि देशाचे कणखर गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांना दिले आहे. Chandrasekhar Bawankule
उद्धव ठाकरे यांच्यात खरंच हिंमत असेल तर त्यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी. हिंदुत्व विसरलेल्या आणि आता काँग्रेससमोर शरण गेलेल्या ठाकरेंना या प्रश्नाचे उत्तर द्यावेच लागेल. Chandrasekhar Bawankule
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार अपमान करणाऱ्या राहुल गांधी यांच्या मुंबईतील स्वागतासाठी उद्धव ठाकरे आसुसलेले आहेत. त्यांच्यासाठी त्यांनी पायघड्या घातल्या आहेत. ‘‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान तुम्ही वारंवार का करता‘‘ हा प्रश्न राहुल गांधी यांना विचारण्याची हिंमत तरी उद्धव ठाकरे दाखवतील का?या प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्रातील जनतेला हवी आहेत. असे सवाल बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना विचारले आहे. Chandrasekhar Bawankule