मुंबई

Sahdev Betkar : रत्नागिरीतील काँग्रेसचा शिलेदार शिवसेनेच्या ठाकरे गटात

•Sahdev Betkar In Uddhav Thackeray Gat मातोश्रीवर काँग्रेस नेत्याची शिवसेनेत घरवापसी

मुंबई :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला कोकणत गळती लागली असताना ठाकरे गटातून आनंदाची बातमी समोर आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात काँग्रेस पक्षाचे आणि शिवसेनेचे माजी नेते सहदेव बेटकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी खासदार संजय राऊत तसेच कोकणातील नेते विनायक राऊत उपस्थित होते.

सहदेव बेटकर यावेळी म्हणाले, मातोश्रीवर 1992 साली मी मोठ्या साहेबांचे दर्शन घेतले होते. मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी नाराज नाही. मी माझ्या घरात वापस आलो आहे. विनायक राऊत यांच्या आशीर्वादाने मी येथे आलो आहे. तसेच यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, सहदेवराव एवढ्या जोरात बोलले की याचा आवाज तळकोकणात गेला असेल. शिवसेना वाढवण्यासाठी शिवसैनिक अहोरात्र काम करत आहेत.

उद्धव ठाकरे लवकरच महाराष्ट्र दौरा करणार!

पक्षप्रवेशाच्या दरम्यान उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना आणि माध्यमांची संवाद साधताना म्हणाले की, येत्या काळात महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचे देखील त्यांनी जाहीर केले आहे. कोकणासाह संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा भगवा फडकवायचा आहे, असेही ठाकरे यावेळी म्हणाले.

उद्धव ठाकरे म्हणाले, संजय राऊत म्हणाले की कोकणात एक पाऊल ठेवा, मी सांगतो केवळ पाय नाही तर पूर्ण कोकणच पुन्हा मिळवणार आहे. बघू कोण आडवा येतो ते. कोकणातील निकाल अनपेक्षित होता. आम्हाला फसवले गेले, आता खरी गरज या शिवसेनेची गरज महाराष्ट्राला आहे. दिलेला शब्दाला पाळणारी केवळ शिवसेना आहे. शिवसेना एकच आहे, दुसरी आहे ती कोण आहे एसंशी! स्वतःच्या स्वार्थासाठी गेलेली ही माणसे आहेत. माझ्यासोबत जी आहेत ती सर्वसामान्य माणसे आहेत.आपापसात जे काही कुरघोडी झाल्या तरी पक्ष सोडून जाऊ नका, असा सल्ला देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी सहदेव बेटकर यांना दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0