मुंबई
Trending

Raj Thackeray : राज ठाकरेंविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका, मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी

Raj Thackeray News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्त्याने निवडणूक आयोगाकडे मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणीही केली आहे. या याचिकेनंतर आता मनसेची प्रतिक्रिया काय आहे? हे पाहणे देखील महत्त्वाचे आहे.

मुंबई :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. गुढीपाडव्यानिमित्त राज ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना काही आदेश दिले होते.राज ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना बँका, दुकाने आणि इतर आस्थापनांमध्ये मराठी भाषा वापरली जात आहे की नाही हे तपासण्यास सांगितले होते. यानंतर, राज्यभरातील मनसे कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या बँकांमध्ये जाऊन मराठी भाषेचा वापर करण्याचा आग्रह धरला.यानंतर, उत्तर भारतीय विकास सेना प्रमुख सुनील शुक्ला यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यांनी आरोप केला की मनसे कार्यकर्ते हिंदी भाषिकांवर हल्ला करत आहेत आणि राज ठाकरेंच्या प्रक्षोभक भाषणांमुळे हे घडत आहे. तसेच त्यांनी निवडणूक आयोगाकडे मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी केली आहे.

खरंतर, राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसे कार्यकर्ते विविध ठिकाणी पोहोचले. काही ठिकाणी बँक कर्मचाऱ्यांनी मराठी बोलणार नाही अशी भूमिका घेतली. याचा राग येऊन मनसे कार्यकर्त्यांनी अशा कर्मचाऱ्यांना मारहाणही केली. या घटनेमुळे बँक कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.दुसरीकडे, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या विनंतीनंतर, राज ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना संबंधित आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले आहे. मात्र, एका उत्तर भारतीय संघटनेच्या प्रमुखाने राज ठाकरे यांच्या विरोधात थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ही याचिका उत्तर भारतीय विकास सेना प्रमुख सुनील शुक्ला यांनी दाखल केली आहे. सुनील शुक्ला यांनी याचिकेत आरोप केला आहे की मनसे कार्यकर्ते हिंदी भाषिकांवर हल्ला करत आहेत.राज ठाकरे यांच्या प्रक्षोभक भाषणांमुळे हिंदी भाषिकांवर हल्ले होत असल्याचा आरोपही याचिकेत करण्यात आला आहे. याचिकाकर्त्याने निवडणूक आयोगाकडे मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणीही केली आहे. या याचिकेनंतर आता मनसेची प्रतिक्रिया काय आहे? हे पाहणे देखील महत्त्वाचे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0