Vasai Cyber Cell : वसईत सायबर सेलच्या वतीने सायबर जनजागृती कार्यशाळा!

Vasai Cyber Cell Latest News समाज उन्नती मंडळ यांच्याकडुन सायबर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन
वसई :- सायबर सेलच्या वतीने येथील समाज उन्नती मंडळ यांना सायबर गुन्हे, स्वसंरक्षण प्रतिकारपर मार्गदर्शन आणि समाज उन्नती मंडळ, माणिकपुर पेट्रोल पंप, वसई येथे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पोलिस कामकाज कसे चालते याची माहिती देण्यात आली.



यानंतर रस्ता सुरक्षा, गुन्हे प्रतिबंध, लहान मुले व महिलांवर होणारे अत्याचार, पोलिस कायदे याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. सायबर विषयक जनजागृतीबाबत पोलीस उप निरीक्षक प्रसाद शेनोळकर (सायबर पोलीस ठाणे) यांनी कार्यक्रमाकरीता उपस्थित असलेल्या 20 ते 60 वयोगटातील शिक्षकेत्तर कुंद व इतर नागरीकांना सविस्तर माहिती देवून मार्गदर्शन केले. ऑनलाइन फसवणूक, सोशल मीडिया या संदर्भात फेसबुक, व्हॉटसॲप, इंस्टाग्राम, टिकटॉक या ॲप्लिकेशनचा वापर करताना काय खबरदारी घ्यावी याबाबत मार्गदर्शन देण्यात आले आहे.
यावेळी 21 ते 65 वयोगटातील एकूण 165 शिक्षकेत्तर वृंद हजर होते. तसेच कार्यक्रमामध्ये उपस्थित शिक्षक व नागरीकांना दैनंदिन जिवनात इंटरनेटच्या माध्यामातुन होणारे आर्थिक व्यवहार व सोशल मिडीया संदर्भात आपण कसे सुरक्षित राहावे याबाबत महत्त्वपूर्ण अश्या सुचना देण्यात आल्यात. सायबर गुन्हे जनजागूतीबाचत पत्रक चाटप करण्यात आली. कार्यक्रमाला उपस्थित श्रोत्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला, तसेच कार्यक्रमाबाबत सकारात्मक प्रतिक्रीया दिलेल्या आहेत.
JESUS ARC FOUNDATION चे अध्यक्ष मॉरीसन डिसा, कार्यकर्ता ॲलीस्टर कोलासो, व सायबर तज्ज्ञ प्रणीत सतेज मिनेझीस यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम यशस्वी झाला आहे.


