Mumbai Crime News : दिवसा आणि रात्री घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीला ॲन्टॉपहिल पोलिसांनी केले गजाआड, दोन गुन्ह्यांची उकल

Mumbai Antop Hill Police Arrested Robbery Criminal : निखिल अनिल कांबळे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर एकूण गुन्हे दाखल आहे
मुंबई :- घरफोडी करणाऱ्या एका सराईत आरोपीला ॲन्टॉपहिल पोलिसांनी अटक केली आहे. निखिल अनिल कांबळे (29 वय रा.आर.सी. एफ.एच.पी. कॉलनी, वाशी नाका, चेंबुर मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. Mumbai Crime News आरोपीवर एकूण वीस गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच आरोपीकडून पोलिसांनी दोन गुन्ह्यांची उकल केली आहे.आरोपी हा दिवसा आणि रात्री घरफोडी करीत असे. Mumbai Latest Crime News
सायन कोळीवाडा येथील सरदार नगर-1 फिर्यादी याच्या घरामध्ये कोण नसताना घराच्या किचनच्या खिडकीची ग्रील तोडून आत मध्ये प्रवेश करून एक लाख 17 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरी केल्याची तक्रार ॲन्टॉपहिल पोलीस ठाण्याला प्राप्त झाली होती.ॲन्टॉपहिल पोलिसांच्या मुले प्रकटीकरण पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे गुन्ह्यातील आरोपी हा सराईत गुन्हेगार त्याच्यावर यापूर्वी 20 गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीचा चेंबूर नाका, चुनाभट्टी, वाशी नाका, नेहरूनगर, कुर्ला, गोवंडी या परिसरात शोध घेऊन आरोपी हा साठे नगर मानखुर्द परिसरात नेहमी सकाळी आणि दुपारच्या दरम्यान येत असल्याची माहिती मिळाली होती. यादरम्यान गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या पोलिसांनी वेशभूषा धारण करून सापळा रचून आरोपीला दोन एप्रिल रोजी अटक केली आहे. आरोपीला पोलिसांनी संशय येऊ नये म्हणून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले आहे. तसेच, अटक आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला 8 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच आरोपीचे सखोल चौकशी केली असता आरोपीने सायन पोलीस ठाणे आणि व्ही.बी. नगर पोलीस ठाणे येथे दोन घरफोडी केल्याचे कबूल केले आहे.

पोलीस पथक
पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त कायदा व सुव्यवस्थासत्यनारायण चौधरी, अप्पर पोलीस आयुक्त मध्य प्रादेशिक विभाग अनिल पारसकर, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-4 रागसुधा आर.,सहायक पोलीस आयुक्त, सायन विभाग शैलेंद्र धिवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ॲन्टॉप हिल पोलीस ठाणे सुधाकर ढाणे, पोलीस निरीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी मदने, सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पाटील, गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार गणेश घुगे, रामेश्वर आंधळे, गोपाळ टेळे, विक्रम कुंभार, सागर गस्ते, गोविंद टोके, सचिन विसपुते, सुरज किरतकर, अक्षय सजगणे, दिनेश पाटील, समाधान ठाकुर, कुमार पाथरूड, सुधीर माने, निलेश माने, परमेश्वर राउत, अनिल गाडगे, यांनी केला आहे.



