मुंबई

Mumbai Railway Mega Block : उद्या रविवारी 6 एप्रिलला मध्य, हार्बर रेल्वेवर ब्लॉक!

रेल्वेरुळांसह सिग्नल यंत्रणेची देखभाल-दुरुस्ती कामकाजामुळे रेल्वे कडून मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. मेगा ब्लॉक दरम्यान अनेक लोकल गाड्या विस्कळीत होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी रेल्वेचे टाईम टेबल बघूनच घराबाहेर पडावे

मुंबई :-मुंबईकरांसाठी तसेच उपनगरीय रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.रेल्वेने रविवारी 6 एप्रिल रोजी ब्लॉक घोषित केला आहे.माटुंगा-मुलुंड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-चुनाभट्टी/वांद्रेदरम्यान मध्य रेल्वे पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते राम मंदिरदरम्यान शनिवारी मध्यरात्रीनंतर ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे रविवारी पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक असणार नाही असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.रेल्वेरुळांसह सिग्नल यंत्रणेची देखभाल-दुरुस्ती करण्यात येते. त्यामुळे अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या असून अनेक लोकल रेल्वे या 15 ते 20 मिनिटांनी उशिराने धावणार आहे.

मध्य रेल्वे
माटुंगा ते मुलुंड अप आणि डाउन जलद दरम्यान सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.ब्लॉकवेळेत अप-डाउन जलद मार्गावरील लोकल फेऱ्या अप-डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. ठाण्यापलीकडे जाणाऱ्या जलद गाड्या मुलुंड स्थानकावर पुन्हा अप-डाउन जलद मार्गावर वळवल्या जातील. यामुळे लोकल फेऱ्या 15 ते 20 मिनिटे विलंबाने धावणार असून काही लोकल रद्द राहणार आहेत.

हार्बर रेल्वे
ठाणे ते वाशी नेरूळ अप आणि डाउन सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.40 मेगा ब्लॉक घेण्यात येणार असून ब्लॉक वेळेत ठाणे ते पनवेल/वाशी/नेरुळदरम्यान धावणाऱ्या ट्रान्स-हार्बरवरील अप आणि डाउन लोकल फेऱ्या बंद राहणार आहेत. हार्बर मार्गावर कोणताही ब्लॉक असणार नाही. यामुळे वेळापत्रकाप्रमाणे हार्बरवर लोकल धावणार आहेत.

पश्चिम रेल्वे

बोरिवली आणि राम मंदिर असा अप आणि डाउन जलद शनिवारी रात्री 12.15 ते रविवारी पहाटे 4.15 मेगा ब्लॉक घेण्यात येणार असून ब्लॉकवेळेत अप आणि डाउन जलद मार्गावरील लोकल फलाटाच्या अनुपलब्धतेमुळे राम मंदिर स्थानकात लोकल थांबणार नाही. ब्लॉकमुळे काही लोकल रद्द राहणार असून काही लोकल उशिराने धावणार आहे. रात्रकालीन ब्लॉकमुळे रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक असणार नाही.

रेल्वे प्रशासन आणि नागरिकांना होणाऱ्या असुविधामुळे खेद व्यक्त करत प्रवाशांनी रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा असे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0