पुणे

Pune Bribe News : वनसंरक्षकाला 1 लाखांची लाच स्वीकारताना जाळ्यात

तक्रारदार यांनी खोदलेला खड्डा वनविभागाच्या जागेत खोदला होता. वनविभागाने सांगितल्यानंतर तक्रारदार यांनी तो खड्‌डा भरला परंतु कोणत्याही प्रकारे गुन्हा दाखल न करण्याकरिता 2 लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी वनसंरक्षक, यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

पुणे :- पाळीव जनावरासाठी मुरघास तयार करण्यासाठी खोदलेला खड्डा वनविभागाच्या जागेत खोदला होता. वनविभागाने सांगितल्यानंतर तक्रारदार यांनी तो खड्‌डा बुजवला. परंतु,गुन्हा नोंदवून कारवाई न करण्यासाठी 2 लाखांची लाच मागितली होती. एक लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी वनसंरक्षक गोविंद रामेश्वर निर्डे (वय 32) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

तक्रारदार यानी त्यांच्या पाळीव जनावरासाठी मुरघास तयार करण्यासाठी खोदलेला खड्डा वनविभागाच्या जागेत खोदला होता. वनविभागाने सांगितल्यानंतर तक्रारदार यांनी तो खड्‌डा बुजवला. परंतु लोकसेवक गोविंद निर्दे यांनी तक्रारदारावर वन अधिनियमानुसार गुन्हा नोंदवून कारवाई न करण्यासाठी तक्रारदाराकडे दोन लाख रुपयाच्या लाचेची मागणी केल्याबाबतची तक्रार 3 एप्रिल तक्रारदार यांनी ला.प्र.वि. पुणे येथे दिली होती.

प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने दि. शुक्रवार 4 एप्रिल रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता, लोकसेवक गोविंद निर्दे यांनी तक्रारदाराकडे त्यांचे विरुद्ध वन जमिनीवर केलेल्या अतिक्रमणावर वन अधिनियमानुसार गुन्हा दाखल न करण्याकरीता सुरवातीस 2 लाख रुपयाचे लाचेची मागणी करुन, तडजोडीअंती एक लाख रुपये लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले. वनसंरक्षक गोविंद निर्डे यांनी तक्रारदाराकडून एक लाख रुपये लाच रक्कम श्रीनाथ रसवंती गृह, वीर फाटा, सासवड, येथे पंचासमक्ष स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले असून, त्यांचेविरुद्ध सासवड पोलीस ठाण्यात, पुणे ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन 1988 चे कलम अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.दयानंद गावडे पोलीस आयुक्त उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे.यांनी कारवाई केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0