Kalyan Bribe News : कल्याण वाहतूक शाखेतील वाहतूक वॉर्डन वाहतूकदाराकडून लाच घेताना अटक

•एका वाहतूकदाराकडून दोन हजार रूपयांची लाच घेताना कल्याण वाहतूक शाखेतील एका वाहतूक वॉर्डन याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
कल्याण :- एका वाहतूकदाराकडून दोन हजार रूपयांची लाच घेताना कल्याण वाहतूक शाखेतील एका वाहतूक वॉर्डन शहर वाहतूक उपशाखा कल्याण येथे ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी संध्याकाळी रंगेहाथ पकडले. या वाहतूक वॉर्डनच्या विरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तक्रारीवरून महात्मा फुले पोलीस ठाण्यातील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
वैभव युवराज शिरसाट, वाहतूक वॉर्डनचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश जागडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. तक्रारदार यांची दुचाकी ही कल्याण येथील वाहतूक वॉर्डन यांनी 1 एप्रिल रोजी कल्याण रेल्वे स्टेशन येथून ताब्यात घेवून ती वाहतूक विभागा मध्ये जमा केली होती, ती सोडवण्यासाठी वाहतूक पोलीस यांनी तक्रारदार यांचे कडे तीन हजार रुपयांची लाच मागीतली आहे. नमुद आशयाची तक्रार तक्रारदार यांनी 2 एप्रिल रोजी ॲन्टी करप्शन ब्युरो ठाणे येथे दिलेली होती.
तक्रारदार यांनी दिलेल्या तकारीचे अनुषंगाने दिनांक 2 एप्रिल रोजी पडताळणी केली असता इतर वैभव युवराज शिरसाट, वाहतूक वॉर्डन,कल्याण वाहतूक विभाग यांनी तक्रारदार यांच्याकडे तडजोडी अंती दोन हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यावरून लाप्रवि ठाणे यांनी दिनांक सापळा रचून वैभव युवराज शिरसाट बाहतूक वॉर्डन यांना तक्रारदार यांच्याकडुन शहर वाहतूक उप शाखा, कल्याण व्या बाहेर सार्वजनिक रस्त्यावर दोन हजार रुपये लाच स्विकारल्यावर रंगेहाथ पकडण्यात आले आहे.