पुणे

Jaiprakash Goel : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक जयप्रकाश गोयल कालवश:

Jaiprakash Goel : गोयल गंगा डेव्हलपमेंटचे सर्वेसर्वा जयप्रकाश गोयल यांचे निधन!

पुणे :- पुण्यातील रियल इस्टेट व्यवसायातून एक अतिशय दुःखद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक जयप्रकाश गोयल Jaiprakash Goel यांचे निधन झाले आहे. गोयल गंगा डेव्हलपर्सचे सर्वेसर्वा जयप्रकाश गोयल यांची मंगळवारी (1 एप्रिल) रोजी दुपारच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. गोयल यांच्या निधनाचे वृत्त ऐकून पुण्यातील बांधकाम व्यवसायिकांमध्ये शोककळा पसरली आहे.

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसाय जयप्रकाश गोयल यांच्या निधनाने कुटुंबियांसह त्यांच्या मित्रांना मोठा धक्का बसला आहे. वयाच्या 76 व्या वर्षी त्यांनी अंतिम श्वास घेतला आहे.त्यांच्यावर उद्या 2 एप्रिल बुधवारी रोजी सकाळी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. पुण्यातील टॉप 10 बांधकाम व्यवसायिकांच्या यादीत गोयल यांचे नाव होते. शून्यातून विश्व निर्माण करून गोयल यांनी गोयल गंगा डेव्हलपर्स नावाची (बांधकाम व्यवसाय) कंपनी निर्माण केली होती.जयप्रकाश गोयल यांच्या पश्चात त्यांची पत्नी गीता जयप्रकाश गोयल,मुलगा अतुल गोयल,अमित गोयल, मुलगी सोनू गुप्ता आणि दीपा कुमार, नातवंड आणि भाऊ असा मोठा परिवार असुन यांच्यावर शोकांतिका पसरली आहे.

गोयल गंगा डेव्हलपमेंट ही पुण्यातील एक प्रसिद्ध रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कंपनी आहे. याने 35 वर्षांहून अधिक काळ निवासी आणि व्यावसायिक प्रकल्प डिलिव्हर केले आहेत. कंपनीची स्थापना जयप्रकाश गोयल यांनी केली होती. गोयल गंगा डेव्हलपर्स त्यांच्या प्रकल्पांमध्ये उत्कृष्ट बांधकाम साहित्य, आधुनिक बांधकाम तंत्र आणि उत्तम गुणवत्ता नियंत्रण उपायांवर भर देतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0