मुंबई

Anand Paranjpe : विजय शिवतारे यांना आनंद परांजपे यांच्याकडून प्रत्युत्तर

ठाणे :- शिंदे गटाचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी बारामतीत अखेर लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. बारामतीवर कोणाची मालकी नाही, मी लढणार म्हणजे लढणारच असे म्हणत त्यांनी निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच अजित पवारांवर गंभीर आरोप देखील त्यांनी केले. Anand Paranjpe Reply Vijay Shivtare

शिवतारे यांच्या भूमिकेवर अजित पवार यांच्या राष्ट्रवावादीचे प्रवक्ते तथा ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी प्रत्युत्तर दिले. बारामतीत अशी भूमिका घेतली असेल तर ठाणे जिल्ह्यातील शिंदेशाही हरवायची का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवतारे यांच्याबद्दल भूमिका स्पष्ट करणार का, असा सवाल देखील त्यांनी केला. Anand Paranjpe Reply Vijay Shivtare

काय म्हणाले आनंद परांजपे?

आनंद पराजंपे म्हणाले की, काही वेळापूर्वीच शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी काही वेळापूर्वीच पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी पुन्हा युतीधर्माविषयी आडमूठी भूमिका मांडली आहे. पवार विरुद्ध लढणारच अशी घोषणा त्यांनी केली. तर आमचे नेते अजित पवार यांच्यावर पुन्हा गंभीर स्वरुपाचे आरोप देखील केले. तसेच आदरणीय शरद‌ पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरही आरोप केले.

आनंद परांजपे पुढे बोलताना म्हणाले की, विजय शिवतारे हे गेल्या दोन दिवसांपासून अजित पवारांवर शिवराळ, वेताळ वक्तव्य करत आहेत. अजित पवार स्पष्ट वक्ते आहेत. तोंडावर बोलून हो ला हो अन् नाही ला नाहीच म्हणणारे ते नेते आहेत. परंतु शिवतारे यांना ते उर्मट नेते वाटत असतील तर त्याला आम्ही काही करू शकत नाही.पवार विरुद्ध पवार लढा मान्य नाही, बारामती कोणी एका घराण्याची नाही, असे म्हणत अजित पवारांवर तोंडसुख घेत आहेत. शिवराळ भाषेत बोलत आहेत हे कितपत योग्य आहे. मुळात बारामतीकरांनी गेल्या 35 वर्षांपासून अजित पवार यांना निवडून दिलेले आहे. तर प्रत्येक निवडणूकीत अधिक मताधिक्याने त्यांचा विजय होत आलेला आहे. शिवतारे जर पवार कुटुंबावर बोलत असतील तर मग कल्याणमधील मतदार संघातील लोकांनी डॉ. श्रीकांत शिंदे यांना कशाला निवडून द्यायला पाहिजे होते. ठाणे-कल्याणमधील लोक देखील शिंदेशाही हरवायची भाषा करू शकत नाही का?, त्यामुळे शिवसेना पक्ष म्हणून एकनाथ शिंदे यांनी शिवतारेंविषयची आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे, अशी भूमिका आनंद परांजपे यांनी मांडली. Anand Paranjpe Reply Vijay Shivtare

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0