Nashik Bribe News : नाशिकमध्ये लाचलुचपत विभागाची मोठी कारवाई; मोटार वाहन निरीक्षक आणि खाजगी व्यक्तींनी स्वीकारली 500 रुपयांची लाच

• Major action taken by anti-corruption department in Nashik ई चलनासाठी मोटार वाहन निरीक्षक आणि दोन खाजगी व्यक्तींना 500 रुपयांच्या लाचप्रकरणी ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे
नाशिक :- नाशिकमध्ये लाचलुचपत Nashik Bribe News प्रतिबंधक विभागाने महत्वाची कारवाई केली असून लाचखोर आरटीओ अधिकाऱ्यांसह दोन खाजगी व्यक्तींना लाच प्रकरणी अटक केली आहे. नितीन भिकनराव अहिरे (49 वय) मोटार वाहन निरीक्षक, मोटार परिवहन विभाग नाशिक आणि विनोद अर्जुन साळवे (47 वय ),मनोहर सुनील निकम (27 वय) असे दोन खाजगी व्यक्ती यांना 500 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक विभागाने ताब्यात घेतले आहे. ई चलनासाठी अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून खाजगी व्यक्तींनी दोन हजार रुपयांची मागणी केली होती.
एसीबीने Anti Corruption Bureau दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार हे सामाजिक कार्यकर्ते असून त्यांनी लोकांसाठी सहलीचे आयोजन करीत असताना वीस मार्चच्या दरम्यान साईबाबा ट्रॅव्हल्स कंपनी बसणे छत्रपती संभाजीनगर नाशिक येथून अंकलेश्वर गुजरात येथे जात असताना पेठ चेक पॉइंट येथे कक्षात हजर असलेल्या खाजगी व्यक्ती विनोद साळवे यांनी परराज्यात प्रवेश करण्यासाठी तडजोड रकमेचे ई चलनासाठी दोन हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडी अंती पाचशे रुपये स्वीकारले असून या प्रकरणी आरोपी विनोद साळवे याला लाच रक्कम घेण्यासाठी प्रोत्साहन दिले होते. आरोपी मनोहर निकम लाज घेऊन विनोद साळवे सुकर होण्यासाठी तक्रारदार यांच्यासोबत असलेल्या पंच यास चेक पॉइंट कक्षात प्रवेश करण्यापासून साहाय्य करून होण्यास सहाय्य केले होते. याप्रकरणी तिघांच्या विरोधात भ्रष्टाचार अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.छत्रपती संभाजीनगर ,मुकुंद अघाव , अपर पोलिस अधीक्षक ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर सुरेश नाईकनवरे, पोलीस उप अधिक्षक ला. प्र. वि. छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी दिलीप साबळे पोलीस उपाधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर सहाय्यक सापळा अधिकारी वाल्मीक कोरे .पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजी नगर सापळा पथक पोलीस हवालदार जीवडे, राजेंद्र जोशी, पोलीस अंमलदार विलास चव्हाण ला. प्र. वि. छत्रपती संभाजीनगर यांनी कारवाई केली आहे.