Swargate bus depo Crime: स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेच्या वकिलावर प्राणघातक हल्ला

Swargate bus depo Crime: वकिल साहिल डोंगरेला हडपसर येथून अपहरण करून बोपदेव घाटात नेण्यात आलं. वकिलाला मारहाण केल्यानंतर त्यांना दिवे घाटात सोडून दिलं.
पुणे :- स्वारगेट शिवशाही अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेचे वकील साहिल डोंगरेंवर जीवघेणा हल्ला झाला आहे. Swargate bus depo Crime काल (17 मार्च ) संध्याकाळी हडपसर येथून डोंगरेंचे अपहरण करुन बोपदेव घाटात नेण्यात आले. तिथे त्यांना बेदम मारहाण करून सोडण्यात आले होते.
मारहाण झाल्यानंतर जखमी अवस्थेत डोंगरेंनी हडपसर पोलीस ठाण्यात Hadapsar Police Station जात तक्रार दिली. हल्याचं कारण अद्याप स्पष्ट नाही तरी, वकील डोंगरेंवर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.डोंगरे हे वाजिद खान यांचे सहाय्यक वकिल आहेत.हडपसर पोलीस ठाण्यात गेल्यानंतर त्यांनी त्यांच्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती दिली. तसेच अज्ञात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. या हल्ल्याचं कारण अस्पष्ट असून, आरोपी दत्ता गाडेच्या वकिलावर हल्ला कुणी आणि का केला? याचा तपास पोलीस करीत आहेत.
पुण्यातीस स्वारगेट बस स्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर पहाटे बलात्कार करणारा आरोपी दत्तात्रय गाडे याला सध्या न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.