Virar Crime News : “सेंच्युरी प्लाय”कंपनीचे मालक असल्याचे भासवून 50 लाखांची फसवणूक करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखा कक्ष-3, विरार यांच्याकडून जेरबंद

•कोलकत्ता येथील एका अंगडिया व्यापाऱ्याची 50 लाखांची फसवणूक करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखा कक्ष-3, विरार यांच्याकडून अटक
विरार :- “सेंच्युरी प्लाय”कंपनीचे मालक असल्याचे भासवून 50 लाखांची कोलकत्ता येथील एका आंगडीया व्यापाराची फसवणूक करणाऱ्या टोळीला विरारच्या गुन्हे शाखा कक्ष-3 यांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे.सैयद रियाज काझी, (वय 36, रा. ग्लोरियस लाईफस्टाईल, स्कायहाईट बिल्डींगच्या पाठिमागे, नालासोपारा पश्चिम), वकप मोहम्मद जावेद चांदीवाला (वय 28, रा. ग्रिन एव्हन्यु बिल्लींग, करारीबाग, टाकीपाडा, नालासोपारा पश्चिम),सचिन मनोहर प्रसाद आर्यभट,( वय 32 रा. मौर्या कंपाऊड चाळ, वाकनपाडा, नालासोपारा पूर्व) तिन्हीही पेशाने ड्रायव्हर असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 मार्च रोजी अज्ञात आरोपींनी सिलीगुडी, कोलकत्ता येथील डॉ. अग्रवाल यांना व्हॉट्सअप कॉल करुन त्यांचे परिचयातील “सेंच्युरी प्लाय” कंपनीचे मालक भजनका बोलत असल्याचे भासवून त्यांचेकडून गुन्ह्यातील फिर्यादी यांचे वडीलांचे मार्फतीने 50 लाख रुपये घेवून फिर्यादी यांचे पैशाची फसवणूक केली असल्याबाबतची तक्रार बाबत 4 मार्च रोजी कोलकत्ता 16, पार्क स्ट्रिट पोलीस ठाण येथे भा.न्या.सं. कलम 61(2), 318(4), 336(3), 338, 350(5) अन्वये गुन्हा नोंद आहे.
गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याचे अनुषंगाने कलकत्ता, राज्य पश्चिम बंगाल येधील पोलीस पथक हे दिनांक 12 मार्च रोजी अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त गुन्हे यांना भेटले असता पोलीस उप आयुक्त गुन्हे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांनी प्रकरणाची गांभिर्यान दखल घेवून गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेणे बाबत पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा कक्ष-2 यांना आदेशीत केले होते.
गुन्ह्याचे तपासादरम्यान कौशल्यपुर्ण व मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तीन आरोपींना यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे गुन्ह्याचे अनुषंगाने चौकशी केली असता त्यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे सदर आरोपींना पुढील कारवाई करीता वरिष्ठ पोलीस निरीक्षक / संदिप दत्त ॲन्टी रायडी सेक्शन डिटेक्टीय डिपार्टमेंट, लालबजार, कोलकत्ता पोलीस यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
पोलीस पथक
मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त,दत्तात्रय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त अविनाश अंबूरे, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मि.भा.वि.व पोलीस आयुक्तालय वांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, पोलीस हवालदार मुकेश तटकरे, रमेश आलदर, सागर बारवकर, प्रशांत पाटील, अमोल कोरे, पोलीस अंमलदार राकेश पवार, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, सुमित जाधव, आतिश पवार, तुषार दळवी, मनोहर तारडे, सागर सोनवणे, प्रविण वानखेडे, गणेश यादव सर्व नेमणूक गुन्हे शाखा कक्ष-3 यांनी उकृष्टरित्या पार पाडली आहे.