क्राईम न्यूजमुंबई
Trending

Mira Road Crime News : मीरा रोड येथे बांगलादेशी महिलांना अटक, आश्रय देणाऱ्या मालकाविरोधातही गुन्हा दाखल

Mira Road Crime Branch Arrested Illegal Bangladeshi Migrant : पांडुरंगवाडी येथे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत बांगलादेशी महिलाची धरपकड केली आहे. बांगलादेशी महिलाना आसरा देणाऱ्या मालकाविरोधात काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिरा रोड :– मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात अवैधरित्या राहत असेल्या बांगलादेशी नागरिकांविरोधात पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली आहे. Mira Road Crime Branch Arrested Illegal Bangladeshi Migrant पोलीस प्रशासनाने बांगलादेशी नागरिकांची शोधमोहीम गांभीर्याने सुरू केली होती. डेल्टा म्हाडा बिल्डींगचे समोर, पाडुरंगवाडी, काशिमीरा येथे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत बांगलादेशी महिलाची धरपकड केली आहे. बांगलादेशी महिलाना आसरा देणाऱ्या मालकाविरोधात काशिमीरा पोलीस ठाण्यात Kashmira Police Station गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सापळा रचुन बांगलादेशी महिला पोलीसांच्या मदतीने ताब्यात घेवून तिचेकडे केलेल्या चौकशीत, ति स्वतः बांगलादेशी नागरीक असुन सुध्दा तिने खोट्या कागदपत्रांचे आधारे भारतीय आधारकार्ड, भारतीय निवडणुक आयोगाचे मतदान ओळखपत्र बनवून त्याचा वापर केला. तसेच आरोपी मालक यास नमुद महिला हि बांगलादेशी नागरीक असल्याचे माहित असतांना देखील तिला बेकायदेशीर वास्तव्यासाठी आश्रय दिलाने त्यांना ताब्यात घेण्यात आले. सदर बाबत दोन पंचासमक्ष पोलीस उपनिरीक्षक प्रकाश तुपलोंढे यांनी सविस्तर पंचनामा केला आहे. ताब्यात घेतलेल्या महिला बांगलादेशी व तिस सहारा देणारा इसम यांच्या विरुध्द महिला पोलीस हवालदार निशिगंधा मांजरेकर यांनी सरकार तर्फे फिर्याद दिल्याने काशिमीरा पोलीस ठाणेत गुन्हा दाखल करुन भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 318,336 (2), 340 (2) सह पासपोर्ट (भारतात प्रवेश) अधिनियम 1920 चे कलम 3,4 सह विदेशी व्यक्ती अधिनियम 1946 चे कलम 7,13,14-अ (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Avinash-Ambure

पोलीस पथक
अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त, (गुन्हे) मि.भा.व.वि.पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष मिरा-भाईंदर पथकाचे पोलीस निरीक्षक देविदास हंडोरे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश तुपलोंढे, सहाय्यक फौजदार उमेश पाटील, अनिल पवार, रामचंद्र पाटील, राजाराम आसावले, शिवाजी पाटील, पोलीस हवालदार किशोर पाटील, पोलीस शिपाई चेतनसिंग राजपुत,केशव शिंदे, महिला पोलीस हवालदार निशीगंधा मांजरेकर, महिला पोलीस शिपाई तृशा कटकधोंड व पोलीस हवालदार सम्राट गावडे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0