नालासोपारा : घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक, 33.25 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

•घरफोडी व चोरी करणाऱ्या सराईत आरोपींना अटक करण्यात विरार गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-3 पोलिसांना यश मिळाले असून आरोपीकडून पोलिसांनी 2 लाख 06 हजार 660 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
नालासोपारा :- शहर व परिसरात घरफोडी व चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक करण्यात विरार गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-3 पोलिसांना यश मिळाले असून आरोपीकडून पोलिसांनी 2 लाख 06 हजार 660 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. 1 ते 6 मार्चच्या दरम्यान फिर्यादी यांच्या घरात कोण नसताना बंद घराचे कडीकोंड्या तोडून आरोपी याने लोखंडी कपाटामध्ये ठेवलेल्या दोन लाख 11 हजार 702 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले होते. त्या विरोधात नालासोपारा पोलीस ठाण्यात फिर्यादी यांनी आरोपीच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 331(2),331(4),305(अ) अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस उप आयुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी दिलेल्या सूचनेनुसार, पोलिसांनी गुन्हा घडल्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीवरून पोलिसांनी संशयित आरोपी शाम चिनाप्पा धोत्रे (41 वय रा. जितू अपार्टमेंट, साईनाथ नगर विरार पूर्व) याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी संशयित आरोपीची सखोल चौकशी केली असता आरोपीने चोरी केल्याचे कबूल केले असून पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून 33.25 ग्रॅम वजन असलेले दोन लाख 06 हजार सहाशे साठ रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहे. अटक आरोपीला पुढील कारवाई करण्याकरिता नालासोपारा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.
पोलीस पथक
मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त सो (गुन्हे) मि.भा.वि.व पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, पोलीस हवालदार मुकेश तटकरे, रमेश आलदर, सागर बारवकर, प्रशांत पाटील, अमोल कोरे, पोलीस अंमलदार राकेश पवार, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, सुमित जाधव, आतिश पवार, तुषार दळवी, मनोहर तारडे,प्रविण वानखेडे, गणेश यादव, सागर सोनवणे सर्व नेमणुक गुन्हे शाखा कक्ष-3 यांनी उकृष्टरित्या पार पाडली आहे.