क्राईम न्यूजमुंबई

Mira Road Sex Racket : वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या दलाला अटक,3 महिलांची पोलिसांनी केली सुटका

Mira Road Sex Racket : मिरा रोड परिसरात वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या वेश्या दलाल माणसाला अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पोलिसांनी अटक केली आहे ; सिनेमा मध्ये काम देतो असे सांगून महिलांची करत होता फसवणूक

मिरा रोड :- दिवसेंदिवस मीरा-भाईंदर वसई विरार परिसरातातील गुन्हे वाढत जात असल्याची घटना घडत आहे. अशातच आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. Mira Road Sex Racket सिनेमांमध्ये साईड हिरोईनचे कामे देतो असे सांगून महिलांची फसवणूक करणाऱ्या आणि मिरा रोडच्या एमआयडीसी परिसरात वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या वेश्या दलाल याला अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पोलिसांनी अटक केली आहे. वेश्या व्यवसायातून 3 महिलांची सुटका करण्यात आली आहे. या 3 महिलांना महिला वस्तीगृहात ठेवण्यात आले आहे. Mira Road Latest Crime News

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, भाईंदर चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास हंडोरे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, काशिमिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एमआयडीसी रोडवर डेल्टा गार्डन बिल्डिंग, बाबा फालूदा पिझ्झा हट हॉटेलच्या समोर एका पुरुषाकडून वेश्याव्यवसाय चालवत असल्याची बातमी मिळाली होती. तसेच, हा वेशा दलाल ग्राहकांना मोबाईल फोनवरून मुलींचे फोटो पाठवून त्यांना वेश्या काम करिता मुलींचे सप्लाय करत होता.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास हंडोरे आणि त्यांच्या पथकाने डेल्टा गार्डन बाबा फालुदा पिझ्झा हट येथे बोगस ग्राहकाच्या माध्यमातून सापळा रचून त्या पुरुष दलाला अटक केली आहे. तसेच, तीन पिडीत तरुणींची सुटका करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. मुलींना सिनेमांमध्ये साईड हिरोईनचे काम देतो असे सांगून त्यांच्याकडून मागील दोन ते तीन वर्षांपासून देह व्यापार करत असल्याची माहिती पोलिसांना पीडितांनी दिली आहे. पोलिसांनी तिन्ही तरुणींना महिला सुधारगृहामध्ये पाठवले आहे. आरोपीच्या विरोधात काशमिरा पोलीस ठाण्यात Kashmira Police Station तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Avinash-Ambure

पोलीस पथक

पोलीस उप आयुक्त अविनाश अंबुरे (गुन्हे), सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ‌ देविदास हंडोरे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश तुपलोंढे, पोलीस सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उमेश पाटील, राजू भोईर, राजाराम आसावले, शिवाजी पाटील, पोलीस हवालदार सम्राट गावडे, किशोर पाटील, पोलीस शिपाई किशोर शिंदे, चेतन राजपूत, महिला पोलीस शिपाई अश्विनी भिल्लारे, त्रिशा‌ कटकधोंड आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पथक यांनी केलेल्या कारवाईत तीन पीडित तरुणींची सुटका करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0