मुंबई
IAS Officer Transfer List : राधाविनोद शर्मा यांची मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती

•IAS Officer Transfer Order राज्यातील आठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई :- राज्य सरकारच्या आठ बड्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरूच असून आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामध्ये MMRDAचे सहआयुक्त राधाविनोद शर्मा यांची मीर भाईंदर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
कोणत्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या?
- राधाविनोद शर्मा (IAS:RR:2012) महानगर सहआयुक्त, MMRDA, मुंबई यांची मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
- एम.जे. प्रदीप चंद्रेन (IAS:RR:2012) अतिरिक्त विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय, मुंबई यांची पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
- बाबासाहेब बेलदार (IAS:SCS:2015) अतिरिक्त विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर विभाग यांची अल्पसंख्याक विकास आयुक्त, छत्रपती संभाजीनगर या पदावर नियुक्त करण्यात आले आहे.
- जगदीश मिनियार (IAS:SCS:2015) मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी, छत्रपती संभाजी नगर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जालना या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
- गोपीचंद कदम (IAS:SCS:2015) मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी, सोलापूर यांची अतिरिक्त आदिवासी आयुक्त, ठाणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- वैदेही रानडे (IAS:SCS:2015) सह व्यवस्थापकीय संचालक, MSRDC, मुंबई यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- डॉ. अर्जुन चिखले (IAS:SCS:2015) सदस्य सचिव, विदर्भ वैधानिक विकास मंडळ, नागपूर यांची फी नियामक प्राधिकरण, मुंबई, सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- डॉ. पंकज आशिया (IAS:RR:2016) जिल्हाधिकारी, यवतमाळ यांची अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.