
Thane Police Busted Sex Racket : वेश्याव्यवसायासाठी मुली पुरविणाऱ्या दलालास गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून दोन पिडीत मुलींची सुटका करण्यात आली आहे.
ठाणे :- वेश्याव्यवसायासाठी मुली पुरविणाऱ्या दलालास गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने अटक केली आहे. Thane Sex Racket त्याच्या ताब्यातून दोन मुलींची सुटका करण्यात आली आहे. दिनेश गोविंद प्रसाद (वय 40 रा. खोणीगाव, कल्याण) असे अटक केलेल्याचे नाव आहे. आरोपीच्या विरोधात उत्तर प्रदेश राज्यातील दोहरीघाट पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीला पळून आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी यांना माहिती मिळाली होती. बंटी ढाबा फॅमिली रेस्टॉरंट, मुंब्रा पनवेल रोड गोठेघर फाटा, डायगर ठाणे या ठिकाणी एक पुरुष दोन महिलांना आणि असहाय्य मुलींना फुस लावून वेश्या व्यवसायासाठी आणणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी बंटी ढाबा फॅमिली रेस्टॉरंट वर सापळा रचून दलाल पुरुषाला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात शिळडायघर पोलीस ठाण्यात Shildayghar Police Station भारतीय न्याय संहिता सन 2023 चे कलम 96, 143 (1), 143 (3) सह लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम सन 2012 चे कलम 17 सह अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम सन 1956 चे कलम 4 व 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.
पोलीस पथक
अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, धनाजी क्षिरसागर सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रतिबंध), गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी, महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहल शिंदे, पोलीस उपनिरीक्षक एन डी क्षिरसागर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिपक वालगुडे, दिपक भोसले, पोलीस हवालदार किशोर पाटील, महिला पोलीस हवालदार आर यु सुवारे, महिला पोलीस अंमलदार हर्षदा थोरात, पी जी खरात, पोलीस हवालदार उदय घाडगे यांनी यशस्वीपणे पार पाडलेली आहे.