Vasai Crime News : वसईमध्ये बंदुकीच्या धाकावर दरोडेखोरांनी दागिन्यांच्या दुकानात लुटमार केली ; पाच आरोपींवर मकोका कायद्यांतर्गत कारवाई

Vasai Robbery Latest News : दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून ज्वेलर्स दुकानदाराला मारहाण करून दुकानातील तब्बल 949.550 दागिने चोरट्यांनी लुटले होते. पोलिसांनी आरोपींच्या विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मकोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे
वसई :- वसईच्या माणिकपूर पोलीस Vasai Manipur Police Station ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मयंक ज्वेलर्समध्ये पाच जणांनी दरोडा टाकला आणि 71 लाख रुपयांचे दागिने घेऊन पळ काढला होता. Vasai Robbery News पोलिसांनी घटनेची गांभीर्यता लक्षात घेऊन पाच ही आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर मकोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण) कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोटस बिल्डिंग,कौल हेरिटेज सिटी, अग्रवाल, वसई पश्चिम येथे मयंक ज्वेलर्सवर 10 जानेवारी 2025 च्या रात्रीच्या सुमारास 25 ते 30 वयोगटातील अनोळखी व्यक्तींनी बंदुकीचा धाक दाखवून “चिल्लाओ मत” अशी धमकी देऊन दुकानदाराला मारहाण करून ज्वेलर्सच्या दुकानातील तब्बल 949.550 ग्रॅम वजनाचे 71 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने पळून नेल्याची तक्रार दुकानाचे मालक रतनलाल छगनलाल संघवी (69 वय) यांनी माणिकपूर पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी सराईत आरोपी यांचे टोळीकडून कौशल्याने तपास करुन पाच आरोपींचा शोध घेतला आहे. पाच आरोपींपैकी दोन आरोपी हे वसई येथील नालासोपारा परिसरात राहणारे आहे तर दोन आरोपी हे सातारा जिल्ह्यातील आहे तसेच उर्वरित एक आरोपी या सोलापूर आणि कर्नाटक येथे राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. पोलिसांनी पाचही आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून 297 ग्रॅम सोन्याचे दागिने ज्याची किंमत 23 लाख 39 हजार 200 रुपयांचे दागिने जप्त केले आहे. तसेच आरोपींकडून, एक ऑटोमॅटिक पिस्तूल, एक जिवंत काडतुस, मोटर सायकल, कोयता, कटर, कटावणी, आणि मोबाईल फोन इत्यादी साहित्य जप्त करून आरोपींच्या विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमन म्हणजेच मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त नवनाथ घोगरे हे करत आहे.
आरोपींची नावे
1.अनुज गंगाराम चौगुले, (वय 36 , रा. 90 फिट रोड, प्रगती नगर, नालासोपारा पूर्व)
2.रॉयल ऊर्फ रॉय एडव्हर्ड सिक्वेरा, (वय 46 रा.टोकपाडा, ता. वसई, जि. पालघर)
3.लालसिंग ऊर्फ सिताराम सर्जेराव मोरे, (वय 56, रा.मोरेवाडी, ता. जि. सातारा)
4.सौरभ ऊर्फ पप्पू तुकाराम राक्षे, (वय 27 रा.खटाव, जि. सातारा)
5.अमर भारत निमगिरे, (वय 21, रा.जि. बिदर, कर्नाटक, मुळ रा.ता. करमाळा, जि. सोलापुर,)
पोलीस पथक
पौर्णिमा चौगुले श्रिंगी, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-2, नवनाथ घोगरे, सहाय्यक पोलीस आयुक्त वसई, हरिलाल जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बालाजी दहिफळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली माणिकपुर गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सनिल पाटील, सागर साबळे, पोलीस हवालदार शैलेश पाटील,शामेश चंदनशिवे, अनिल डावरे, पोलीस शिपाई संतोष म्हस्के, गोविंद लवटे, आनंदा गडदे, प्रविण कांदे, यांनी यशस्विरीत्या पार पाडली आहे.