Steve Smith retires from ODIs : भारताकडून पराभूत झाल्यानंतर स्टीव्ह स्मिथने निवृत्ती जाहीर केली, आता फक्त याच फॉरमॅटमध्ये खेळणार!

Steve Smith retires from ODIs : ऑस्ट्रेलिया संघ चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधून बाहेर पडला आहे. या स्पर्धेतून बाहेर पडताच ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने वनडे फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मात्र, स्टीव्ह स्मिथ कसोटी आणि टी-20 फॉरमॅटमध्ये खेळत राहणार आहे.
ANI :- चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये ऑस्ट्रेलिया संघाचा प्रवास संपला आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात त्यांना भारताविरुद्ध 4 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. Steve Smith retires from ODIs या पराभवानंतर संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने मोठी घोषणा केली आहे. स्टीव्ह स्मिथने वनडे फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे.स्टीव्ह स्मिथने जवळपास 15 वर्षे ऑस्ट्रेलियाकडून एकदिवसीय क्रिकेट खेळले. या काळात त्याने अनेक प्रसंगी संघाचे नेतृत्वही केले. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीतही ऑस्ट्रेलियाने त्याच्यावर विश्वास दाखवला होता.
35 वर्षीय स्टीव्ह स्मिथने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीतील पराभवानंतर आपल्या सहकाऱ्यांना आपल्या निर्णयाबद्दल सांगितले.स्टीव्ह स्मिथ म्हणाला, ‘हा एक अद्भुत प्रवास होता आणि मी प्रत्येक मिनिटाचा आनंद लुटला आहे. खूप छान क्षण आणि छान आठवणी आहेत. दोन विश्वचषक जिंकणे ही एक मोठी उपलब्धी होती आणि अनेक अद्भुत संघमित्रांनीही हा प्रवास शेअर केला.आता 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकाची तयारी सुरू करण्याची उत्तम संधी आहे, त्यामुळे ही योग्य वेळ आहे असे वाटते.
स्टीव्ह स्मिथ पुढे म्हणाला, ‘कसोटी क्रिकेटला अजूनही प्राधान्य आहे आणि मी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी उत्सुक आहे, हिवाळ्यात वेस्ट इंडिजविरुद्ध आणि त्यानंतर घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. मला वाटते की त्या व्यासपीठावर मला अजूनही बरेच योगदान करायचे आहे.
स्टीव्ह स्मिथने 2010 मध्ये वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या काळात त्याने ऑस्ट्रेलियासाठी एकूण 170 एकदिवसीय सामने खेळले. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 43.28 च्या सरासरीने 5800 धावा केल्या, ज्यात 35 अर्धशतके आणि 12 शतके आहेत.तो आपल्या देशाचा एकदिवसीय सामन्यांमध्ये 16 वा सर्वाधिक सामने खेळणारा आणि सर्वाधिक धावा करणारा 12वा खेळाडू आहे. त्याचबरोबर टीम इंडियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातही त्याची कामगिरी चांगली होती. स्मिथने भारताविरुद्ध 30 एकदिवसीय सामने खेळले आणि 53.19 च्या सरासरीने 1383 धावा केल्या. ज्यामध्ये 7 अर्धशतके आणि 5 शतके आहेत.