क्राईम न्यूजपुणे
Trending

काळेपडळ पोलिसांची मोठी कारवाई; गावठी दारू भट्ट्या केल्या उद्ध्वस्त,3 लाख 08 हजारांचा मुद्देमाल जप्त

Kalepadal Police Busted Deshi Daru Adda : हांडेवाडी पार्क जवळ काळेपडळ भागात उरुळी देवाची येथील हातभट्टीच्या अड्यावर काळेपडळ पोलिसांनी छापेमारी केली. एकाला अटक केली आहे.

पुणे :- हांडेवाडी ट्रेड पार्क काळेपडळ भागात आदर्श नगर उरुळी देवाची येथील हातभट्टीच्या अड्यावर काळेपडळ पोलिसांनी छापेमारी केली. Kalepadal Police Busted Deshi Daru Adda या छापेमारीत तब्बल 1 हजार 540 लिटर गावठी दारू तसेच 44 कॅन मध्ये ठेवलेले गावठी दारू असा 3 लाख 08 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर, एकाला अटक केली आहे.

अजित संतोष जयस्वाल (रा.काळेपडळ, हडपसर, पुणे)असे अटक करण्यात आलेल्याचे नावे आहे.त्यांच्यावर काळेपडळ पोलीस ठाण्यात Pune Kalepadal Police News गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक गायकवाड, सहाय्यक पोलीस फौजदार रमेश गरुड यांच्यासह पथकाने केली. Pune Police News

शहरातील अवैध धंदे बंद करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार Pune CP Amitesh Kumar यांनी दिले आहेत. तरीही शहरात छुप्या पद्धतीने अवैध धंदे सुरू असल्याचे वारंवार दिसून येत आहे. यादरम्यान, काळेपडळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस फौजदार गायकवाड व त्यांचे पथक हद्दीत गस्त घालत होते. यादरम्यान ,आदर्श नगर, हांडेवाडी ट्रेड पार्क जवळ, उरुळी देवाची, पुणे गावठी हातभट्टी दारू गाळण्याच्या तयारीत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानूसार पथकाने सापळा रचून या भागात छापा टाकला. येथून पोलिसांनी तयार हातभट्टीच्या दारूने भरलेले 44 कॅन व 1540 लिटर गावठी दारूचा साठा असा एकूण तीन लाख 8 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांना आढळून आला आहे. पोलिसांनी जेसीबीच्या साह्याने या अवैध दारू साठी बांधलेले पत्र्याचे शेड उध्वस्त करून आरोपींना अटक केली आहे.

ही कारवाई अमितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर ,रंजन कुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त पुणे शहर, मनोज पाटील, अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, डॉ.राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-5 यांचे मागदर्शनाखालीसहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वानवडी विभाग पुणे, मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस ठाणे, पुणे शहर, यांचे सुचनेप्रमाणे सहा पोलीस निरीक्षक गायकवाड, सहाय्यक पोलीस फौजदार रमेश गरुड, पोलीस हवालदार दाऊद सय्यद, पोलीस हवालदार अमोल फडतरे, पोलीस हवालदार संजय देसाई, पोलीस हवालदार परशुराम पिसे, पोलीस हवालदार कांबळे, पोलीस अंमलदार अतुल पंधरकर, पोलीस अंमलदार सद्दाम तांबोळी, पोलीस अंमलदार शाहिद शेख यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0