Mumbai Drug News : मुंबई अहमदाबाद महामार्गावरील पेट्रोल पंप येथे अंमली पदार्थ विक्री करणारा गजाआड, पाच लाखांचे चरस जप्त

Virar Crime Branch arrested Drug Smuggler : अंमली पदार्थ विक्री प्रकरणात गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने दोघांना तरुणाला अटक केली. एकाला कल्याण भागातील टिटवाळा परिसरात ही कारवाई करण्यात आली.
विरार :- अंमली पदार्थ विक्री Drug selling प्रकरणात गुन्हे शाखेच्या Virar Crime Branch अंमली पदार्थ विरोधी पथकाने दोघांना अटक केली. पहिल्या आरोपीला मुंबई-अहमदाबाद हायवे परिसरातील जय अंबे पेट्रोल पंप जवळून नायगावं भागतुन अटक करण्यात आली आहे. तर त्याचा साथीदार याला मोरया नगर टिटवाळा येथून अटक करण्यात आली आहे.आरोपीकडून चरस अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. साधारणता पाच लाख रुपयांचा 133 ग्रॅम वजनाचा चरस अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील अंमली पदार्थ विक्रीवर कडक कारवाई करण्याचे निर्देश वरिष्ठांनी दिले. त्यानंतर मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस पथक विरार परिसरातील मुंबई अहमदाबाद महामार्गावर पेट्रोलिंग करत असताना जय आंबे पेट्रोल पंप जवळ एक व्यक्ती संशयितरित्या हातात पिशवी घेऊन उभा होता. पोलिसांनी त्या व्यक्तीची चौकशी केली असता त्याच्याकडे 133 ग्रॅम वजनाचे पाच लाख रुपयांचे चरस अंमली पदार्थ पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी याप्रकरणी नवीन निरज झा, (वय 45, रा. सर्व्हे क्र.5, पाटील पाडा चिचोटी, नायगांव पूर्व) आणि त्याच्या साथीदार मुकेशकुमार शंकर साह, (वय 28 रा., मोर्या नगर, टिटवाळा, मुळ राह- जिल्हा मुजफरपुर, राज्य बिहार) याला देखील मध्यवर्ती गुन्हे शाखेने ताब्यात घेचुन पुढील कारवाई करीता नायगाव पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे. गुन्हयाचा पुढील तपास नायगांव पोलीस स्टेशन करीत आहे. मी आरोपीच्या विरोधात नायगाव पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याअंतर्गत कारवाई करून अटक करण्यात आली आहे.

पोलीस पथक
पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे व सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक अधिराज कुराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय सरक, नितीन बेद्रे, प्रशांत गांगुर्डे, पुष्पराज सुर्वे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रीमंत जेधे, मनोहर तावरे, आसीफ मुल्ला, पोलीस हवालदार संतोष मदने, शिवाजी पाटील, विजय गायकवाड, रविंद्र भालेराव, गोविंद केंद्रे, प्रविणराज पचार, हनुमंत सूर्यवंशी, धनंजय चौधरी, समीर यादव, विकास राजपुत, संदिप शेरमाळे, रविंद्र कांबळे, पोलीस अंमलदार नितीन राठोड, सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण,सचिन चौधरी यांनी यशस्वी कामगिरी केलेली आहे.