
Jalna Bribe News : साठ हजार रुपयांचे घरकुलाचे अनुदान खात्यावर वर्ग करण्यासाठी सरपंचाकडून 15000 रुपयांची लाचेची मागणी, लाच स्वीकारताना सरपंच एसीबीकडून अटक
जालना :- पंतप्रधान आवास योजना PM Avas Yojna In Jalna अंतर्गत मोफत केंद्र सरकारच्या घरकुल योजनेअंतर्गत गरजू व गरीब लोकांना घरे बांधून दिले जातात. परंतु, या योजनेत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालत असल्याचे अनेक घटना पाहत असताना जालन्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. Jalna Bribe News सरपंचाने घरकुल योजनेतील लाभार्थ्याला शासनाकडून आलेले 60 हजार रुपये खात्यावर वर्ग करण्यासाठी पंधरा हजार रुपयांची लाच मागितली आहे. 10 Thousand Bribe For Gharkul In Jalna दहा हजार रुपयाची लाच स्वीकारताना सरपंच याला ताब्यात घेण्यात आले आहे. सतीश बप्पासाहेब पाटेकर (35 वय) असे सरपंचाचे नाव आहे .ग्रामपंचायत माळी पिंपळगाव, जालना येथे सरपंच आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार,तक्रारदार यांचे घरकुलाचे अनुदानाचे रुपये 60 हजार त्यांचे खात्यात वर्ग करणे साठी 15 हजार रुपये लाचेची मागणी करत असलेबाबत तक्रार प्राप्त झाली. तक्रारदार यांनी सोमवारी (03 मार्च) रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना येथे समक्ष हजर येऊन लिखित तक्रार दिली. त्या अनुषंगाने 3 मार्च रोजी तक्रारदार व पंच क्र,1 यांना भालेनगरी मस्तगड जालना येथे पाठवून लाच मागणी पडताळणी केली असता,सतीश पाटेकर सरपंच (ग्रामपंचायत माळी पिंपळगाव ता जि जालना) यांनी तक्रारदार यांच्याकडे 15 हजार रुपयाची लाचेची मागणी करून तडजोड अंती 10 हजार स्वतः स्वीकारन्याचे मान्य केले.
यातील इतर सरपंच संतोष पाटेकर यांनी तक्रारदार यांचेकडून 10 हजार रुपये लाच रक्कम भालेनगरी मस्तगड (ता. जी.जालना) येथे पंचासमक्ष स्वतः स्वीकारली असता त्यांना लाचेच्या रकमेसह पकडले आहे. संतोष पाटेकर यांचे पोलिस ठाणे कदीम जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करून पुढील तपास करण्यात येत आहे.

एसीबी पथक
संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.छत्रपती संभाजीनगर,मुकुंद अघाव , अपर पोलिस अधीक्षक ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर ,सुरेश नाईकनवरे पोलीस उप अधिक्षक ला. प्र. वि. छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी- वाल्मीक कोरे पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगर सापळा सहाय्यक अधिकारी- अमोल धस, पोलीस निरीक्षक ला. प्र. वि छत्रपती संभाजी नगर सापळा पथक – पोलीस हवालदार राजेंद्र जोशी , पोलीस अंमलदार युवराज हिवाळे ला. प्र. वि.छत्रपती संभाजीनगर यांनी कारवाई केली आहे.