Share Market Fraud : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक की मध्ये जास्त परताव्याच्या आमिषाचा बळी, सायबर पोलिसांची दमदार कामगिरी

Mira Road Share Market Fraud News : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केलेले पैसे चोरट्याने डल्ला, सायबर विभागाची कामगिरी पैसे परत मिळवून देण्यास यश
मिरा रोड :- मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील नवघर पोलीस ठाण्याच्या Navghar Police Station परिसरात राहणाऱ्या विजय राज वासुदेव कलारी वालापल्ली यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळण्याची आमिष दाखविले. Share Market Fraud News त्यानंतर त्यांनी शेअर मार्केट ॲप मध्ये ऑनलाईन 10 लाख 07 हजार 998 रुपयाची ऑनलाईन गुंतवणूक केली होती. परंतु आपली आर्थिक फसवणूक झालेली लक्षात येताच त्यांनी नवघर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींच्या विरोधात भादवी कलम 420,34 तंत्रज्ञान (सुधारणा), अधिनियमन 2008 कलम 66 (डी),66 (सी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या सायबर विभागाने विनय यांच्या तक्रारीवरून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे खात्यासंदर्भात पडताळणी केली.पोलिसांनी विनय यांनी पाठविलेल्या बँक खात्यावरील रक्कम गोठाविण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यानंतर पोलिसांनी बँक, न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून फसवणुकीतील 10 लाख 07 हजार 997 रुपयांच्या रक्कमेपैकी 2 लाख 7 हजार 997 रुपये सायबर विभागाने विनय खात्यात पुन्हा आणून दिले आहे. पोलिसांच्या या कामगिरीमुळे ऑनलाइन फसवणुकीत बळी पडलेल्यांना रक्कम परत मिळवून देण्यास पोलिसांना यश आले आहे.

पोलीस पथक
अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), मि.भा.व.वि. पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, सहाय्यक फौजदार फर्नांडिस, पोलीस अंमलदार सावन शेवाळे, ओंकार डोंगरे, सोमनाथ बोरकर यांनी पार पाडली आहे.