Mira Road News : पोलीस आणि मोहल्ला कमिटी यांच्यात बैठक ; रमजानच्या महिन्यात शांततेच्या आवाहन

Mira Road Latest News. : नयानगर पोलिसांनी रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटी, मोहल्ला कमिटी, मस्जिद मदरसा, ट्रस्टी मौलाना यांच्यात बैठक
मिरा रोड :- 1 मार्च ते 31 मार्चपर्यंत रमजान सण मुस्लिम बांधवांकडून साजरा केला जातो. Mira Road Police News रमजान हा मुस्लिम बांधवांसाठी पवित्र सण आणि पवित्र महिना म्हणून पाहिले जाते. Ramjan मुस्लिम बांधव या एक महिन्याच्या कालावधीत उपवास करत असतात आणि त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांकडून खबरदारी म्हणून नया नगर पोलिसांनी या रमजानच्या महिन्यात शांत व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून शांतता कमिटी, मोहल्ला कमिटी, मस्जिद मदरसा, ट्रस्टी मौलाना आणि प्रतिष्ठित नागरिकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत जवळपास 110 ते 115 मुस्लिम बांधवांनी उपस्थिती लावली होती.
मिरा रोड मधील नया नगर हा परिसर मिश्र हिंदू मुस्लिम लोकवस्ती आहे. मागील वर्षी सामाजिक तणाव निर्माण झाल्यामुळे दोन्ही समाज एकमेकांच्या समोर आले होते. त्यामुळे पोलिसांनी या पार्श्वभूमीवर शांतता आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये याकरिता रसाज इंटरनॅशनल स्कूलच्या हॉलमध्ये बैठक आयोजित केली होती. या बैठकीत बोलला शांतता कमिटी सदस्य मस्जिद मदरसा, मोहल्ला कमिटी, ट्रस्टी मौलाना आणि इतर प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. या बैठकीत पोलिसांनी दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करू नये तसेच शांततेत धार्मिक कार्य करावे असे आवाहन पोलिसांनी या बैठकीदरम्यान केले होते.
पोलिसांकडून रमजान सणाचे अनुषंगाने खालील प्रमाणे सुचना देण्यात आल्या
1.रमजान सणाचे अनुषंगाने रहदारीच्या ठिकाणी वाहतूक कोंडी होचुन नये याकरीता चाहतुक नियंत्रण करीतापोलीस उप आयुक्त, मुख्यालय, मि. भा. व. वि. यांचेकडुन पारीत झालेल्या वाहतुक नियंत्रण अधिसूचनेची विस्तृत माहीती देण्यात आली.
2.वाहतूक नियंत्रण अधिसूचनेच्या अनुषंगाने वाहतुकीसाठी करण्यात आलेले पर्यायी रस्ते व पार्किंगबाबतची माहीती देण्यात आली.
3.हॉकर्स व भिकारी यांचेवर महापालिकेच्या मदतीने कारवाई करीत असल्याची माहीती दिली.
4.सुरक्षिततेच्या दृष्टीने मस्जिद /मदरसां मधील सीसीटीव्ही कॅमेरे सुस्थितीत असल्याबाबत खात्री करणेबाचत सूचना देण्यात आल्या.
5.सणाच्या अनुषंगाने घ्यावयाची दक्षता, ध्वनी प्रदुषण, सोशल मिडीयावरील अफवांवर विश्वास न ठेवण्याबाबत, तसेच काही तक्रार अथवा अडचण असल्यास त्वरीत पोलीस विभागाशी संपर्क करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-1, मिरारोड, विवेक मुगळीकर, सहाय्यक पोलीस आयुक्त, नवघर विभाग, नवघर तसेच नवानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर जगदाळे यांनी संबोधित करुन सदरचा सण कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू न देता शांततेत पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले.