
Mir Road Tadipar News : काशिगाव पोलिसांनी सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे
मिरा रोड :- नयानगर, काशिमीरा, काशिगाव पोलीस ठाण्याच्या kashigaon Police Station हद्दीतील सराईत गुन्हेगार याला दोन वर्षांसाठी पोलीस उपायुक्त परिमंडळ-1 यांनी तडीपार करण्याचे निर्देश दिले आहे. आरोपीला मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर या चार जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता हद्दपार केले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. सलमान नियाज अहमद कुरेशी (29 वय रा. काशिमिरा) असे तडीपार केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय, अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप आयुक्त परिमंडळ-1 प्रकाश गायकवाड यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील असलेल्या काशिगाव पोलीस ठाण्यातील सन 2015 ते 2023 या कालावधीमध्ये अनेक अपराध करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला दोन वर्षासाठी तडीपार केले आहे. महिलांवर अत्याचार, गर्दी करून गंभीर गुन्हे करणे, अंमली पदार्थ बाळगणे विक्री करणे अशा प्रकारचे गंभीर सहा गुन्हे आरोपी सलमान कुरेशी याच्यावर दाखल आहे असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहेत.