ठाणे

Thane Crime News : बॅग चोरणारी आंतरराज्य टोळी गाजाआड!

•काचा फोडून कारमधील बॅग चोरी करणाऱ्या दोन सराईत आरोपींना अटक

ठाणे :- रस्त्यावर पार्क केलेल्या कारच्या काचा फोडून आतील बॅग आणि सामान चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.त्यांच्याकडून एकूण 4 गुन्हे उघडकीस करण्यात आले आहेत.अरविंद दिनेश जाटव, (वय 26),साहिल कुमार रमेशचंद्र जाटव, (वय 24) असे अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत.ग्राम-जगमोहनपुरा, जिल्हा भरतपुर, राज्य-राजस्थान इथल्या असून सध्या ते दर्शन लॉज, जुहूनगर, वाशी, नवी मुंबई येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे.

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा, घटक-1, ठाणे यांना माहिती मिळाली की, घोळ गणपती, पुजा पंजाब हॉटेल जवळ, महापे रोड, ठाणे पश्चिम या ठिकाणी पार्किंग मध्ये उभ्या केलेल्या वाहनाच्या काचा तोडून वाहनातील बॅग व किमंती मुददेमाल चोरी करणारे व्यक्ती येणार आहेत. त्या अनुषंगाने गुन्हे शाखा, घटक-1, ठाणेच्या पोलीस पथकाने घोळ गणपती, पुजा पंजाब हॉटेल जवळ, महापे रोड, ठाणे प. येथे सापळा रचला असता, तेथे त्यांना दोन व्यक्तींना संशयास्पद स्थितीत मोटर सायकलवर दिसले.त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत असताना दोघेही नवी मुंबईच्या दिशेने पळून जावू लागल्याने पोलीस पथकाने त्यांचा पाठलाग करुन त्यांना दर्शन लॉज जवळ, वाशी, सेक्टर 11, नवी मुंबई या ठिकाणी पकडले त्यांच्याकडे केलेल्या चौकशी त्यांनी त्यांची ओळख सांगितले. पोलिसांनी अरविंद जाटव आणि साहिल जाटव या दोघांनाही ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आरोपीची सखोल चौकशी केली असता आरोपींनी ठाणे, नवी मुंबई परिसरातील शिळडायघर, खारघर, पनवेल तालुका, कोपर खैरणे या पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटार सायकल व बॅग लिफ्टींगचे 04 गुन्हे केले असल्याची कबुली दिली आहे चारही पोलीस ठाण्याचे गुन्हे उघडकीस आणले असून पोलिसांनी आरोपींच्या विरोधात शिळडायघर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303 (2), 324(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हयाच्या पुढील तपास करीता आरोपींना शिळ डायघर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलीस पथक

अमरसिंह जाधव, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, शोध-1, गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक यादव, पोलीस उपनिरीक्षक घुगे, पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नाईक, सुनिल माने, पोलीस हवालदार सोनकडे, प्रशांत निकुंभ, धनंजय आहेर, पोलीस हवालदार शशिकांत सावंत, पोलीस अंमलदार सागर सुरळकर, मयुर लोखंडे, गुन्हे शाखा, घटक-1, ठाणे यांच्या पथकाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0