क्राईम न्यूजपुणे

स्वारगेट बलात्कार प्रकरण : आमदार रोहित पवार यांचे पोलिसांवर गंभीर आरोप

Pune Swargate Rape Case Latest Update : खासदार सुप्रिया सुळे यांचाही थेट पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप व्यवस्थापकांनी पत्र देऊनही पोलिसांकडून दुर्लक्ष

पुणे :- स्वारगेट बलात्कार प्रकरणाला Pune Swargate Rape Case नवीन वळण लागले असून सध्या फरार आरोपीला शोधण्यासाठी एकीकडे पोलिसांनी Pune Police बक्षीस जाहीर केले असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे Supriya Sule आणि आमदार रोहित पवार Rohit Pawar यांनी 22 फेब्रुवारी 2025 स्वारगेट पोलिसांना दिलेल्या पत्राची प्रत ट्विट करत पोलीस प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सुप्रिया सुळे यांनीही पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केले आहे. त्या संदर्भातील पत्र ट्विट केले आहे.

रोहित पवार काय म्हणाले?
स्वारगेट बसस्थानकाच्या आगार व्यवस्थापकांनी पोलिसांना 22 फेब्रुवारी 2025 रोजी पत्र लिहून बसस्थानकातील सुरक्षेसंदर्भात कारवाई करण्याची मागणी केली होती. पण यावर ना पोलिसांनी कारवाई केली ना विभागाकडून काही ठोस उपाययोजना केल्या गेल्या, परिणामी काल एका तरूणीवर अत्याचाराची घटना घडली हे आपल्या व्यवस्थेला शोभणारं आहे का?

रोहित पवार पुढे म्हणाले की,पोलिसांनी गुंडांवर काय कारवाई केली? पोलीस अन् स्थानिक गुंडांचे काय हितसंबंध आहेत? नेमक्या कुणाच्या फायद्यासाठी खाजगी एजंट्सना बसस्थानकात प्रवेश दिला जातो? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं सामान्यांना हवी आहेत. संबंधित घटनेस जबाबदार असलेल्या खाजगी सुरक्षा रक्षकांना निलंबित केले गेले पण त्यांच्याशी हितसंबंध जोपासणाऱ्या व्यवस्थेतील दलालांवर काय कारवाई होणार? की जनतेची मेमरी शॉर्ट असते असं म्हणून नेहमीप्रमाणे जबाबदारी झटकत सरकार मोकळे होणार?

खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री यांच्याकडे पुण्याच्या कायदा सुव्यवस्था संदर्भात आढावा घेण्याची मागणी केली आहे

स्वारगेट बस स्थानकाच्या परिसरात एका तरुणीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भाने गंभीर प्रश्न उभा राहिले आहेत. स्वारगेट आगारप्रमुखांनी वेळोवेळी पोलीस प्रशासनाला बस स्थानकावर खासगी एजंट आणि इतर असामाजिक तत्वांचा त्रास होत असून यावर कारवाई करावी असे पत्र दिले आहे. परंतु तरीही पोलीस प्रशासनाने कोणतीही कारवाई केल्याचे दिसून येत नाही.स्वारगेट बस स्थानक हे कायम वर्दळीचे ठिकाण असून येथे पोलीस यंत्रणा अधिक सजग असण्याची गरज आहे. परंतु जर आगारप्रमुखांनी पत्र लिहूनही त्याची दखल घेतली जात नसेल तर ते अतिशय खेदजनक आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचा तातडीने आढावा घेऊन महिला सुरक्षेच्या संदर्भाने तसेच बस स्थानकाच्या सुरक्षेच्या संदर्भाने कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0