Ajit Pawar : पुणे बसस्थानकात तरुणीवर झालेल्या बलात्काराप्रकरणी अजित पवार संतापले, म्हणाले- ‘आरोपी सापडला तर ताबडतोब फाशी द्या’

Ajit Pawar On Pune Swargate Rape Incident : तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फलटणला जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकावर बसची वाट पाहत उभ्या असलेल्या तरुणीसोबत या तरुणाने हे घृणास्पद कृत्य केले.
पुणे :- पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर पहाटे शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. Pune Swargate Rape Case फलटणला जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकावर बसची वाट पाहत उभ्या असलेल्या तरुणीसोबत या तरुणाने हे घृणास्पद कृत्य केले.फलटणला जाणारी बस दुसऱ्या कुठून तरी सुटेल, असे बसची वाट पाहत बाकावर बसलेल्या तरुणीला आरोपी तरुणाने खोटे सांगितले आणि त्यानंतर तिला जाळ्यात अडकवून तिच्यावर बलात्कार केला. आरोपी दत्तात्रय गाडे Criminal Dattray Gade हा सध्या फरार आहे. वर्दळीच्या बसस्थानकात ही घटना घडल्याने सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. पवार म्हणाले की, महाराष्ट्रात अशी दुर्दैवी घटना घडली हे अतिशय खेदजनक आहे.
अजित पवार म्हणाले की, स्वारगेट बस स्थानकावर आमच्या बहिणीवर झालेल्या बलात्काराची घटना अत्यंत दुर्दैवी, वेदनादायी आणि सुसंस्कृत समाजासाठी संतापाची भावना आहे. हे लज्जास्पद आहे. आरोपीने केलेला गुन्हा क्षम्य नाही आणि त्याला फाशीच्या शिक्षेपेक्षा कमी शिक्षा होऊ शकत नाही.मी स्वत: पुणे पोलिस आयुक्तांशी बोलून या प्रकरणाची तातडीने चौकशी करून आरोपींना तात्काळ अटक करण्याचे निर्देश दिले आहेत.
खासदार सुप्रिया सुळे यांनीही ट्विट करत संताप व्यक्त केला
अतिशय संतापजनक!
स्वारगेटसारख्या गजबजलेल्या बस स्थानक परिसरात एका तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे स्वारगेट बस स्थानकाच्या जवळच पोलीस ठाणे आहे. शिवाय पोलीस कर्मचारी बस स्थानकावर वेळोवेळी गस्त घालत असतात. तरीही अशा पद्धतीचा घृणास्पद गुन्हा करण्याची आरोपीची हिंमत होते ही बाब गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही हे दर्शविणारी आहे. या राज्यात महिलांसाठी सुरक्षित जागा राहिलीच नाही का असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.पुण्यात दररोज कुठे ना कुठे गंभीर गुन्हे घडतच आहेत. त्यांवर आळा घालण्यात गृहखात्याला यश आलेले नाही. ही घटना म्हणजे कायदा सुव्यवस्थेची कशा पद्धतीने दुर्दशा झाली याचे प्रत्यंतर देणारी आहे. या प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे . यासाठी हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा अशी आमची मागणी आहे.