Mumbai Breaking News : मुंबईत मंत्रालयाच्या इमारतीवरून माणसाने उडी मारली, जाळीवर पडून थोडक्यात बचावला

Man Jumps off Mantralaya Building in Alleged Suicide : मंत्रालयातील सुरक्षा जाळ्यावरून एका व्यक्तीने उडी मारली. पोलिसांनी त्या व्यक्तीला जाळ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
मुंबई :- मंगळवारी (25 फेब्रुवारी) एका व्यक्तीने महाराष्ट्र सरकारच्या प्रशासकीय मुख्यालयाच्या इमारतीवरून कथितरित्या उडी मारली Man Jumps off Mantralaya Building in Alleged Suicide आणि तेथे बसवलेल्या सुरक्षा जाळ्यावर पडला. पोलीस अधिकारी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.
मंत्रालयाच्या सुरक्षा जाळीमध्ये एका तरुणाने सहाव्या मजल्यावर उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यासोबत त्याने “इन्कलाब जिंदाबाद”पोस्टर घेऊन मंत्रालयाच्या जाळीवर तरी उडी मारली. या घटनेनंतर मंत्रालयात एकच खळबळ उडाली आहे. मंत्रालयात मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक असते. या बैठकीला राज्यातील सर्व कॅबिनेट मंत्री उपस्थित असतात तेव्हाच असा प्रकार घडल्याने मंत्रालय प्रशासनाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे. सोशल मीडियावर तरुणाने मंत्रालयाच्या जाळीवर मारलेल्या उडीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
