महाराष्ट्र
Trending

Karnataka Maharashtra ST Bus: महाराष्ट्र ते कर्नाटक एसटी बसची सेवा बंद, या कारणामुळे घेतला निर्णय

Karnataka Maharashtra ST Bus: कर्नाटकात महाराष्ट्र एसटी बस चालकांवर हल्ल्यानंतर कोल्हापूर ते कर्नाटक बससेवा अनिश्चित काळासाठी बंद. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले.

मुंबई :- 21 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बसेसवर झालेल्या हल्ल्यानंतर परिवहन विभागाने महाराष्ट्र ते कर्नाटक एसटी सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. Karnataka Maharashtra ST Bus या निर्णयामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होऊ शकते, मात्र सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे पाऊल आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

21 फेब्रुवारी रोजी रात्री 21:10 वाजता, मुंबई डेपोची एसटी बस बेंगळुरूहून मुंबईकडे जात असताना, चित्रदुर्गाच्या दोन किलोमीटर आधी काही अज्ञात समाजकंटकांनी जबरदस्तीने बस थांबवली. हे हल्लेखोर कर्नाटकातील एका स्थानिक संघटनेशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे.

समाजकंटकांनी बसचे नुकसान तर केलेच शिवाय ड्युटीवर असलेल्या ड्रायव्हर आणि कंडक्टरवरही हल्ला केला. या हिंसक हल्ल्यात कोल्हापूर आगारात कार्यरत असलेले चालक भास्कर जाधव हे जखमी झाले.

या हल्ल्याचे गांभीर्य लक्षात घेऊन एमएसआरटीसीने कर्नाटक राज्याकडे जाणाऱ्या सर्व बस सेवा तत्काळ प्रभावाने रद्द केल्या आहेत. कोल्हापूर विभागातून कर्नाटकात जाणाऱ्या बसेस अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्या आहेत.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, जोपर्यंत प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची पूर्ण हमी मिळत नाही तोपर्यंत सेवा पूर्ववत होणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0